शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पानसरे खूनप्रकरणाच्या तपासाबाबत सरकार गंभीर नाही : एन. डी. पाटील यांचा आरोप, तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:32 IST

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे १० महिने झाले तरी संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांचा शोध लागलेला नाही. त्यांची संपत्ती जप्त केलेली नाही, तसेच त्यांच्या छायाचित्रांचेही सार्वत्रिकरण केलेले नाही, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. यावरून हे सरकार व पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा आरोप कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केला.

ठळक मुद्देतपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमावा : प्रा. एन. डी. पाटील प्रा. एन. डी. पाटील कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीचे अध्यक्षशिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी सुभेदार यांची भेटपानसरे खूनप्रकरणातील तपासाबाबत पोलीस व शासनाच्या कार्यवाहीबद्दल केली विचारणा

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे १० महिने झाले तरी संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांचा शोध लागलेला नाही. त्यांची संपत्ती जप्त केलेली नाही, तसेच त्यांच्या छायाचित्रांचेही सार्वत्रिकरण केलेले नाही, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. यावरून हे सरकार व पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा आरोप कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केला.पानसरे खूनप्रकरणातील तपासाबाबत पोलीस व शासनाच्या कार्यवाहीबद्दल विचारणा करण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते.प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, पानसरे खुनाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथका(एसआयटी)तील तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची पदोन्नतीवर बदली झाली; परंतु अद्याप त्यांच्या जागी नव्या अप्पर पोलीस अधीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे याचा तात्पुरता पदभार हा इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांच्याकडे आहे. या तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नसल्याने योग्य पद्धतीने तपास होताना दिसत नाही.

फरारी आरोपींच्या फोटोंचे सार्वत्रिकरण पोलिसांकडून झालेले नाही. त्यामुळे सरकारही याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’च्या तपास अधिकाºयांची त्वरित नियुक्ती करावी. या तपासावर पूर्णवेळ काम करणारा तपास अधिकारी नियुक्त करावा व फरारी आरोपींच्या शोधमोहिमेसाठी एक विशेष पथक त्वरित नियुक्त करावे, या मागण्यांबाबत तातडीने शासनाला कळवावे. कारण सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये यावर चर्चा होईल.पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले, या तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी असावा, असे आपलेही मत आहे. त्यामुळे मी व जिल्हाधिकारी या मागण्यांबाबत आजच सरकारला कळवू. यावेळी दिलीप पवार, प्रा. टी. एस. पाटील, मेघा पानसरे, चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, धनाजीराव जाधव, सतीशचंद्र कांबळे, एस. बी. पाटील, सीमा पाटील, गीता हसूरकर, एम. बी. पडवळे, जमीर शेख, आप्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार