शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन: सरकारच्या भूमिकेचा निषेध; कोल्हापुरातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

By संदीप आडनाईक | Updated: December 15, 2023 18:44 IST

जिल्ह्यातील ६५ हजार कर्मचारी, शिक्षक पूर्ववत कामावर हजर

कोल्हापूर : जुन्या पेन्शनसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्याच्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करत एनपीएस' पेन्शनधारक कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन प्रशासन व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संप स्थगित करत आहे, अशी घोषणा निमंत्रक अनिल लवेकर यांनी शुक्रवारी केली. दुपारनंतर जिल्ह्यातील ६५ हजार कर्मचारी, शिक्षक पूर्ववत कामावर हजर झाले.कोल्हापूरतील संघटनेला हा निर्णय मान्य नाही,  राज्य सरकारने व समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीला विश्वासात न घेता संप मागे घेतल्याचा निषेध व्यक्त केला आहे.  विविध राज्यस्तरीय संघटनांकडून आदेश आल्याने तसेच कर्मचारी, शिक्षक कामावर हजर होत आहेत त्यामुळे हा संप तात्पुरता स्थगित करत आहोत, परंतु अधिवेशनापर्यंत वाट पाहू अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा लवेकर यांनी दिला आहे. टाऊन हॉल उद्यान येथे आंदोलनस्थळी शुक्रवारी सरकारी कर्मचारी शिक्षष्य, शिक्षकेतर कर्मचारी व एनपीएस पेन्शनधारक कर्मचारी यांच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील समन्वय समितीने ही भूमिका जाहीर केली. यावेळी निमंत्रक अनिल लवेकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, प्रशासन व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून 'एनपीएस' कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ व १३ डिसेंबरला काही आमदारांनी जुन्या पेन्शनसंदर्भात अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला होता. त्यावर गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये पेन्शनबाबत निर्णय घेण्याची उत्तर दिले. परंतु सरकारने जुन्या पेन्शनबाबत नेमलेल्या समितीकडून अहवाल प्राप्त झाला असताना या अधिवेशनात तो मांडून निर्णय का घेतला नाही ? असा सवाल करून सरकारची भूमिका ही आचारसंहिता लागेपर्यंत टाळण्याची आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याची असल्याचा आरोप केला. यावेळी दिलीप पवार, वसंत डावरे, भरत रसाळे, राहुल शिंदे, अनिल घाटगे, सुधाकर सावंत, रमेश भोसले, नंदकुमार इंगवले, उदय लांबोरे, राजन नाळे, प्रदीप शिंदे, संदीप पाटील, संजिवनी दळवी, राणी शिरसाद, सतीश ढेकळे, अमर पाटील, सुशांत पाटील, गजानन पवार, बाजीराव कांबळे, अतुल काकडे, कुमार कांबळे, आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.६५ हजार कर्मचारी कामावरसंपामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, सर्व प्रांताधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, शासकिय मुद्रणालय, आरोग्य, कृषी, शिक्षण, जी, एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोषागार कार्यालय, पाटबंधारे आदी शासकिय कार्यालये व शाळा बंद असल्याने दिवसभर शुकशुकाट होता, परंतु संप स्थगित झाल्याने शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्यातील ६५ हजार कर्मचारी कामावर हजर झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPensionनिवृत्ती वेतनStrikeसंपGovernmentसरकार