शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

कोल्हापूर :  रेणुका अंबील यात्रेला नैवेद्यच द्या, पुजाऱ्यांचे आवाहन : शिधा ठेवण्याची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 11:55 IST

रेणुकामातेच्या येत्या शनिवारी (दि. २९) होणाऱ्या अंबील यात्रेत देवीला भाविकांनी नैवेद्यच द्यावा; त्याऐवजी शिधा देऊ नये. नैवेद्यच देण्याचे माहात्म्य असल्याचे आवाहन रेणुका देवस्थान समितीचे जोगता पुजारी सुनील विलास मेढे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे रेणुका अंबील यात्रेला नैवेद्यच द्यापुजाऱ्यांचे आवाहन : शिधा ठेवण्याची अडचण

कोल्हापूर : रेणुकामातेच्या येत्या शनिवारी (दि. २९) होणाऱ्या अंबील यात्रेत देवीला भाविकांनी नैवेद्यच द्यावा; त्याऐवजी शिधा देऊ नये. नैवेद्यच देण्याचे माहात्म्य असल्याचे आवाहन रेणुका देवस्थान समितीचे जोगता पुजारी सुनील विलास मेढे यांनी केले आहे.दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुकादेवीचा कंकण विमोचन सोहळा होतो. श्री जमदग्नीच्या हत्येनंतर रेणुकादेवीला वैधव्य प्राप्त होते. या विधीसाठी कोल्हापुरातील मानाचे जग सौंदत्ती क्षेत्री जातात. अंबील यात्रेच्या आदल्या दिवशी हे जग परत येतात.रेणुकादेवीचे तसेच तिच्यासोबत विधवा होऊन आलेल्या तिच्या देवदासींचे, जोगत्यांचे सांत्वन करण्याकरिता रेणुकादेवीचे आवडते अन्नपदार्थ म्हणजे दहीभात, अंबील, वडी-भाकरी, वरण्या-वांग्याची भाजी, मेथीची भाजी हे पदार्थ त्याचबरोबर गाजर, केळी, कांद्याची पात, लिंबू अशा भाज्या व फळे देवीला अर्पण करून तिचे दु:ख हलके करण्याचा प्रघात आहे. त्याचबरोबर या ऋतूत (हिवाळ्यात) नव्याने आलेल्या अन्नपदार्थांचा शरीरालाही उपयोग होतो.

या यात्रेच्या निमित्ताने भाविक देवीच्या दर्शनाला येतात. आणलेल्या नैवेद्याचा सहभोजनाद्वारे आस्वाद घेतात. जमा झालेला नैवेद्यही देवस्थान समिती भक्तांनाच प्रसाद स्वरूपात परत करते. गेली सात वर्षे काटेकोर काळजी घेऊन अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मंदिर प्रशासन दक्षता घेत आहे; परंतु असे असताना या वर्षीच भाविकांतून नैवेद्याऐवजी शिधा देण्याची चर्चा सुरू झाली आहे.

या यात्रेला प्रचंड संख्येने भाविक येतात. त्यांचा शिधा घेऊन त्याचे करायचे काय, अशी अडचण निर्माण होईल. शिवाय आता आम्ही देवीचा प्रसाद म्हणून जो नैवेद्य परत करतो, तो तसा करता येणार नाही.

शिधा घेऊन त्यातून भात-आमटी भाविकांना शिजवून घालता येईल; परंतु कांदा-पातीसह भाविकांकडून देवीला अर्पण झालेला नैवेद्यच पुन्हा भाविकाला प्रसाद म्हणून परत वाटणे यामध्ये माहात्म्य आहे. ती परंपरा मोडली जाऊ नये म्हणून भाविकांनी नैवेद्यच द्यावा, असे आवाहन पुजारी मेढे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर