शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दूधविक्रीवर १० टक्के कमिशन द्या, शहरातील विक्रेत्यांची ‘गोकुळ’कडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:21 IST

दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली.

ठळक मुद्देदूधविक्रीवर १० टक्के कमिशन द्या, शहरातील विक्रेत्यांची ‘गोकुळ’कडे मागणीसर्वसाधारण सभेनंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन

कोल्हापूर : दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली. संघाची सर्वसाधारण सभेनंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले.कोल्हापूर शहरातील म्हैस व गाय दूध विक्रेत्यांना प्रतिलिटर १ रुपया ९० पैसे कमिशन दिले जाते. वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय परवडत नसल्याने कमिशनमध्ये वाढ करा. ‘अमूल’ व ‘कृष्णा’ आपल्या वितरकांना प्रतिलिटर तीन रुपये कमिशन देते. त्यामुळे दुधाच्या विक्री किमतीवर १० टक्के कमिशन द्या, तसे लेखी द्या; म्हणजे जसे दुधाचे दर वाढत जातील तसे कमिशन आपोआपच वाढेल, अशी मागणी शिष्टमंडळाने अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे केली.

त्याचबरोबर दर महिन्याला कपात करण्यात येणारी रक्कम दिवाळीला द्यावी, यासह विविध मागण्या वितरकांनी संघाकडे केल्या. यावेळी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करता येणार नाही. त्याचा परिणाम मुंबई मार्केटवर होईल. त्यामुळे सध्यातरी कमिशन वाढ करता येणार नाही. संघाची सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात आहे. त्यानंतर मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले.यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, राजेश काळे, धैर्यशील घोरपडे, हणमंत पाटील, सुनील पाटील यांच्यासह शहरातील विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर