शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रिक्त पदे स्विकृत करण्यास संस्थांना मुभा, ‘गोकुळ’, जिल्हा बॅकेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:20 IST

विविध कारणाने सहकारी संस्थांच्या संचालकांच्या जागा रिक्त झाल्या तर त्याठिकाणी स्विकृत म्हणून घेण्याचा अधिकार संस्थांना द्यावा. याबाबतचा महत्वपुर्ण प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधीकरणाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. यामुळे जिल्ह्यातील ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह विविध संस्थांच्या संचालक मंडळातील रिक्त पद भरण्याचा मार्ग होऊ शकतो.

ठळक मुद्दे ‘गोकुळ’, जिल्हा बॅकेला दिलासाप्राधीकरणाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

कोल्हापूर : विविध कारणाने सहकारी संस्थांच्या संचालकांच्या जागा रिक्त झाल्या तर त्याठिकाणी स्विकृत म्हणून घेण्याचा अधिकार संस्थांना द्यावा. याबाबतचा महत्वपुर्ण प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधीकरणाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. यामुळे जिल्ह्यातील ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह विविध संस्थांच्या संचालक मंडळातील रिक्त पद भरण्याचा मार्ग होऊ शकतो.जुन्या सहकारी कायद्यानुसार रिक्त पदी थेट नियुक्ती करण्याचा अधिकार संचालक मंडळाला होता. पण ९७ व्या घटना दुरूस्ती नंतर याबाबत स्पष्टता नसल्याने गुंता वाढत गेला. एखाद्या संस्थेची निवडणूक झाली आणि अडीच वर्षाच्या आत संचालक मंडळातील जागा रिक्त झाली तर तिथे निवडणूक घ्यावी. त्यानंतर रिक्त झाली तर स्विकृत करण्याची मुभा दिली होती. यामुळे संस्थांचा निवडणूकीसाठी खर्च होणार असल्याने पुर्वीप्रमाणे स्विकृत घेण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी संस्थांची होती.या गुंत्यामुळेच ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेतील संचालक पदे रिक्त आहेत. ‘गोकुळ’ च्या निवडणूकीनंतर वर्षभरातच सुरेश पाटील व चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन झाले. सुरेश पाटील यांच्या ठिकाणी सत्यजीत पाटील यांना घेतले असले तरी त्यांची नियुक्ती कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती.

बोंद्रे यांच्या जागी अद्याप कोणालाही स्विकृत करून घेतलेले नाही. जिल्हा बॅँकेच्या पात्र-अपात्रतेच्या नाट्यात के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी राजीनामे दिले होते, त्यांच्या ठिकाणी बॅँकेने अनुक्रमे रणजीतसिंह पाटील व अर्चना पाटील यांना स्विकृत करून घेतले. पण त्यांच्या नियुक्तीसमोरही प्रश्नचिन्ह होते.

नरसिंगराव पाटील यांच्या निधनामुळे गेले दोन वर्षे त्यांची जागा रिक्त आहे. यासह जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये हीच अडचण आहे. संस्थांवर पडणारा निवडणूकीचा नाहक खर्च टाळण्यासाठी प्राधीकरणाने सरकारकडे प्रस्ताव ठेवला आहे. 

 

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर