शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

Ganesh Chaturthi 2018 : कोल्हापूर गणेशोत्सव : राजारामपुरीत अवतरले ‘संत बाळूमामा’, ‘इंद्रमहल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 6:00 PM

गणेशोत्सव काळात आपली वेगळी ओळख जपणाऱ्या राजारामपुरीने यंदाही तांत्रिक देखावे,आकर्षक महलसह सजीव देखाव्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. येथील सर्व देखावे सुरू झाल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्देराजारामपुरीत अवतरले ‘संत बाळूमामा’, ‘इंद्रमहल’५० उंच दहीहंडी, चांद्रयान मोहीम देखावे पाहण्यासाठी गर्दी

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात आपली वेगळी ओळख जपणाऱ्या राजारामपुरीने यंदाही तांत्रिक देखावे,आकर्षक महलसह सजीव देखाव्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. येथील सर्व देखावे सुरू झाल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत आहे.यंदाच्या गणेशोत्सवात राजारामपुरी दहावी गल्ली येथील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने ‘राजारामपुरीचा राजा’ या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्याचसोबत ३० बाय ८० फूट असा भव्य, आकर्षक इंद्रमहाल उभा केला आहे. अंतर्गत सजावट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सहाव्या गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळातर्फे या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ‘दहीहंडी’ हा तांत्रिक देखावा; तर नऊ नंबर शाळेजवळील ‘आदमापूरचे संत बाळूमामा’ यांचा सजीव देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.शिवाजी विद्यापीठ रोड येथील शाहूराजे मित्रमंडळाची ‘कोल्हापूर दक्षिणचा राजा’ २१ फुटी आकर्षक दगडूशेठ गणपती पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे. अकरावी गल्ली येथील युवक मित्रमंडळाच्या ‘चांद्रयान मोहीम’ तांत्रिक देखाव्याच्या माध्यमातून अवकाश संशोधनाची परिपूर्ण माहिती दिली जाते. सातव्या गल्लीतील न्यू फ्रेंड्स मित्रमंडळाचा ‘सायकल चालवा’ हा संदेश देणारा देखावा आहे; तर ‘गडकोट वाचवा’ हा संदेश देणारा देखावा फ्रेंड्स तरुण मंडळाने यंदा साकारला आहे.

कोल्हापुरातील राजारामपुरी दहावी गल्ली येथील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने आकर्षक इंद्रमहल उभा केला आहे. (छाया : नसीर अत्तार)सहाव्या गल्लीतील भगतसिंग तरुण मंडळाची चिंतामणी रूपातील भव्य २१ फुटी आकर्षक गणेशमूर्ती आहे. हिंदवी स्वराज्य मित्रमंडळाचा ‘एक मराठा - लाख मराठा’ सजीव देखावा, पाचव्या गल्लीतील विवेकानंद मित्रमंडळाने सजीव देखावा साकारला आहे. चौथ्या गल्लीतील जय मराठा तरुण मंडळाने नागपंचमी हा तांत्रिक देखावा आहे; तर तिसरी गल्लीतील एकता मित्रमंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा इच्छापूर्ती महादेव तांत्रिक देखावा व मंडपातच पंजाची प्रतिष्ठापना केली आहे. तिसºया गल्लीतील राजारामपुरी स्पोर्टस्ने जोधपूरमधील तारा मंदिर साकारण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर