शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सहाव्या दिवशी वाहतूकदारांची ‘गांधीगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:30 IST

माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची धार आणखी वाढू लागली आहे. गुरुवारी शहरातून मालाची ने-आण करणाऱ्या अनेक टेम्पोंच्या चाकांतील हवा सोडून आंदोलकांनी त्या चालकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

ठळक मुद्देसहाव्या दिवशी वाहतूकदारांची ‘गांधीगिरी’मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील हवा सोडून दिले गुलाबाचे फूल

कोल्हापूर : माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची धार आणखी वाढू लागली आहे. गुरुवारी शहरातून मालाची ने-आण करणाऱ्या अनेक टेम्पोंच्या चाकांतील हवा सोडून आंदोलकांनी त्या चालकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. हे आंदोलन लवकर न मिटल्यास अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो, असे व्यापाºयांकडून सांगितले जात आहे.गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या झेंड्याखाली सर्व वाहतूक संघटनांनी देशव्यापी चक्का जाम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शहरातील मालवाहतूक बंद झाली आहे. त्यात गेले सहा दिवस छोट्या टेम्पोंतून साठा केलेला माल गोडावून ते व्यापाऱ्यांचे दुकान इथपर्यंत नेला जात होता. मात्र, गुरुवारी आदर्श टेम्पो युनियनने आंदोलनास पाठिंबा व्यक्त केल्यानंतर टेम्पोंमधून होणारी वाहतूकही रोखण्यात आली.

दिवसभरात मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोंमधीलही वाहतूक रोखली जात होती; तर गाडी जाग्यावरच थांबून राहावी याकरिता आंदोलक पुढील चाकांतील हवा सोडत होते. यासह त्या चालकाने आंदोलनात सहभागी व्हावे, म्हणून त्याला गुलाबपुष्पही दिले जात होते.दरम्यान, लॉरी आॅपरेटर्सच्या पदाधिकाऱ्यांनी उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंप येथे गेल्या दोन दिवसांपासून लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. यासह प्रबोधन करण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उजळाईवाडी ते निपाणी या राष्ट्रीय महामार्गावरून फेरी मारत अनेक ठिकाणी मालवाहतूकदारांचे प्रबोधन केले.

संपाचा परिणाम म्हणून पालेभाज्या, कडधान्ये यांचे दरही वाढू लागले आहेत; तर शहराला गॅस सिलिंडरचा पुरवठा मिरज येथील गॅस कंपन्यांतून सुरळीतपणे सुरू आहे. महामार्गावरील मालवाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे अवजड वाहनांची ये-जा अत्यल्प प्रमाणात दिसत आहे. याचा फायदा प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना होऊन त्यांना विनाअडथळा कमी अवधीत इप्सित स्थळी पोहोचता येत आहे.

 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर