शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

कोल्हापूर : गगनबावडा, शाहूवाडी, चंदगडमध्ये दमदार पाऊस, नद्यांच्या पातळीत वाढ, चार बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी गगनबावडा, शाहूवाडी, चदंगड तालुक्यात दमदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे. भोगावती नदीवरील एक, तर पंचगंगा नदीवरील तीन, असे चार बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी १७.५ फुटापर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्दे गगनबावडा, शाहूवाडी, चंदगडमध्ये दमदार पाऊस, नद्यांच्या पातळीत वाढ, चार बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी गगनबावडा, शाहूवाडी, चदंगड तालुक्यात दमदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे. भोगावती नदीवरील एक, तर पंचगंगा नदीवरील तीन, असे चार बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी १७.५ फुटापर्यंत पोहोचली आहे.सात-आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवार (दि.३)पासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. मंगळवारी उघडझाप राहिली तरी बुधवारी सकाळपासून हळूहळू पाऊस वाढत आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, आजरा तालुक्यांत चांगला पाऊस सुरू आहे. उर्वरित तालुक्यात उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.

कोल्हापूर शहरातही दिवसभरात चांगला पाऊस झाला. पाच-दहा मिनिटे पावसाच्या सरी कोसळायच्या, पण पाणी पाणी करत होत्या. दुपारच्या टप्यात पावसाने थोडी उघडीप दिली, पण सायंकाळनंतर शहरात भुरभुर राहिली.बुधवारी(दि.४) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक पाऊस ५२.०० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला तर सर्वांत कमी हातकणंगले तालुक्यात ४.९ मिलिमीटरची नोंद झाली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून राधानगरी, दूधगंगा, कुंभी, कोदे या धरणक्षेत्रात चोवीस तासांत अतिवृष्टी झाली आहे. ‘दूधगंगा’ धरणक्षेत्रात ७८ तर ‘कुंभी’ परिसरात ८६ मिलिमीटर पाऊस झाला. ‘भोगावती’ नदीवरील ‘शिंगणापूर’ तर ‘पंचगंगा’ नदीवरील ‘राजाराम’, ‘रूई’ व ‘इचलकरंजी’ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा :हातकणंगले (४.९), शिरोळ (५.८५), पन्हाळा (१२.२९), शाहूवाडी (२९.८३), राधानगरी (२४.१७), गगनबावडा (५२.००), करवीर (७.००), कागल (१२.५७), गडहिंग्लज (३.१४), भुदरगड (११.००), आजरा (१५.००), चंदगड (१२.५०). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर