शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक, चार बंदुका, दारूगोळा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:44 IST

आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघाजणांच्या शिकारी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि. १३) अटक केली. त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर गावठी एकनळी काडतुसाच्या व ठेसणीच्या चार बंदुका व दारूगोळा जप्त केला आहे.

ठळक मुद्देचौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक, चार बंदुका, दारूगोळा जप्त

कोल्हापूर : आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघाजणांच्या शिकारी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि. १३) अटक केली. त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर गावठी एकनळी काडतुसाच्या व ठेसणीच्या चार बंदुका व दारूगोळा जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित कृष्णात गणपती पाटील (वय ४९), शिवाजी बाळू जोशी (३८), नाना पांडुरंग पाटील (४२), संजय तुकाराम पाटील (३८, सर्व रा. आपटाळ, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.  बुधवारी त्यांना राधानगरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.नालासोपारा येथील स्फोटकांचा साठा मिळाल्यानंतर राज्यात हाय-अलर्टच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये बिगर परवाना रिव्हॉल्व्हर, पिस्तुल, बंदुका अशी हत्यारे बाळगून त्याद्वारे समाजात दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. तसेच वन्य प्राण्यांची शिकार करतात. अशा व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सावंत यांना दिले होते.

सावंत यांना पोलीस हवालदार नरसिंग कांबळे, प्रल्हाद देसाई यांचे बातमीदारातर्फे आपटाळ येथील कृष्णात पाटील, शिवाजी जोशी, नाना पाटील, संजय पाटील हे बेकायदेशीर सिंगल बोअर काडतुसाच्या व ठेसणीच्या बंदुका जवळ बाळगून वन्य प्राण्यांची शिकार करीत असतात, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी दुपारी आपटाळ गावी छापे टाकून चौघांच्या घरातून बंदुका जप्त केल्या.

त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. या सर्व संशयितांना राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, उपनिरीक्षक सचिन पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती द्याजिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दहशत व वन्य प्राण्यांची कोणी शिकार करीत असेल, तर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. यापुढे अशा बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर