शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Kolhapur football matches: ‘पीटीएम-शिवाजी’ हाय व्होल्टेज लढत, फुटबॉलप्रेमींची तुडूंब गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:18 IST

कोल्हापूर : के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबाॅल लीग स्पर्धेतील विजेतेपदासाठी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात लढत सुरु ...

कोल्हापूर : के.एस.ए.वरिष्ठ गट फुटबाॅल लीग स्पर्धेतील विजेतेपदासाठी पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात लढत सुरु आहे. दुपारी ४ वाजता या हाय व्होल्टेज सामन्यास सुरुवात झाली आहे. हा सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे मैदान अक्षरश: तुंडूब भरले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर शिवाजी तरुण मंडळाचे १३, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ)चे बारा गुण झाले आहेत. आजच्या सामन्यास दोन्ही संघांच्या समर्थकांची मोठी गर्दी अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी दोन्ही संघांच्या पदाधिकारी व प्रमुख नागरीकांची बैठक पोलीस ठाण्यात घेतली होती.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सरकारने निर्बधांमध्ये शिथीलता आणली. यानंतर मैदानी स्पर्धेला सुरुवात झाली. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्पर्धा पुन्हा सुरु झाल्याने खेळाडूसह प्रेक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. निर्बध शिथील होताच कोल्हापुरात फुटबॉल सामन्याना सुरुवात करण्यात आली. अन् सुनेसुने झालेले मैदान प्रेक्षकांनी पुन्हा फुलून गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल