शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:20 IST

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच

विश्वास पाटील

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात  शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. मात्र, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे तब्बल  एक लाखाहून अधिक जणांना स्थलांतर करावे लागले आहे. 

सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करत आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे महापुराचे पाणी असून कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. 

हंगामातील ३० टक्के पाऊस पडला दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळा हंगामात सुमारे चार महिन्यांत जेवढा पाऊस पडतो, त्यातील तब्बल एक तृतांश म्हणजे ३० टक्के पाऊस अवघ्या दीड-दोन दिवसांत कोसळल्याने जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाचा हा बदललेला पॅटर्न अधिक धोक्याचा आणि नुकसानकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१९ ला ही असाच तुफानी पाऊस कोसळला होता. कोकणच्या खालोखाल पाऊस पडणारा घाटमाथ्यावरील जिल्हा अशी कोल्हापूरची पारंपरिक ओळख आहे. या जिल्ह्यात एकूण १४ नद्या वाहतात. जिल्ह्यात साधारणत: जूनपासून सप्टेंबरपर्यंत किमान ८५० ते ९०० मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत. त्यातही पावसाच्या प्रमाणातही असमतोल आहे. यंदाच्या पावसाळ्यात गुरुवार आणि शुक्रवारी ३३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यावरून पावसाची तीव्रता काय असू शकेल याचा अंदाज येऊ शकतो.

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच. धरणक्षेत्रात पडलेला पाऊस धरणात अडवला जातो; परंतु यंदा धरण क्षेत्राबाहेरच (फ्री कॅटमेंट) जास्त पाऊस पडला तो सगळा वाहून नदीतून महापुरास कारणीभूत ठरला आहे. नदी पात्रालगत झालेली प्रचंड बांधकामे, नाले-ओढे भिंती बांधून बंदिस्त केल्याचा परिणाम आणि त्याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे. 

सांगली : कृष्णेचे पाणी ५२ फुटांवरजिल्ह्यातील कृष्णा व वारणाकाठची पूरस्थिती शनिवारी तीव्र झाली असली तरी रविवारी महापुराचा विळखा सुटण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी २४ तासांत दहा फुटाने वाढली. सांगली व इस्लामपूरचा संपर्क तुटला.

कोयना : दरवाजे साडेेपाच फुटांवरसातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली. धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर आणण्यात आले. धरणातून ३०,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अनेक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

चिपळूण, खेडमध्ये पंचनामे सुरू चिपळूण आणि खेडमधील संपूर्ण बाजारपेठच पुराच्या पाण्यात गेल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासूनच हाती घेतले आहे. इतिहासात प्रथमच दोन दिवसांत ६०० मि. मी. पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली आहे.  आजवर २००५ च्या पुराची पाणी पातळी विक्रमी मानली जात होती. मात्र, यावेळी आलेला पूर त्याहीपेक्षा कितीतरी भयानक होता. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर