शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाच आरोग्य केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा बंद : कंत्राटदार देईना दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:55 IST

जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पाच केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा गेले काही महिने बंद पडली आहे; मात्र कंत्राटदारही दाद देत नसल्याने अजूनही याची दुरुस्ती झालेली नाही.

ठळक मुद्देआरोग्य खात्याचेही दुर्लक्ष, किती वीज बचत होणार याचे त्रैराशिक चांगले मांडले गेलेआरोग्य विभागालाही माहीत नाही

समीर देशपांडे ।कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पाच केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा गेले काही महिने बंद पडली आहे; मात्र कंत्राटदारही दाद देत नसल्याने अजूनही याची दुरुस्ती झालेली नाही. दुसरीकडे सुमारे एक कोटी रुपये खर्चून बसवलेल्या या यंत्रणेच्या माध्यमातून नेमकी किती रुपयांची वीज बचत झाली याचीही आकडेवारी आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.

सन २0१५/१६ मध्ये ९७ लाख ५0 हजार रुपये खर्चून प्रत्येक केंद्रांवर ३ किलो वॅटची ही सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली. दवाखान्यामध्ये गरम पाणी अत्यावश्यक असल्याने वीज बिल बचत करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. साडेतीन वॅटच्या एका यंत्राचे साडेतीन लाख रुपये आणि वायरिंगचे ४0 हजार रुपये, अशा पद्धतीने एका केंद्रासाठी ३ लाख ९0 हजार रुपये खर्च करण्यात आला.

सांगली येथील वेदांत रिन्युएबल कंपनीकडे याचा ठेका देण्यात आला होता. ही यंत्रणा नीट चालण्याचा हमी कालावधी ५ वर्षे असून, याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची आहे. तसेच यातील यंत्रणा खराब झाल्यास त्याला १0 वर्षांची वॉरंटी आहे.२0१६/१७ मध्ये बहुतांशीकेंद्रांवर ही यंत्रणा बसवून झाली; मात्र आता इस्पूर्ली, कणेरी,नृसिंहवाडी यांसह आणखी २प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील हीयंत्रणा बंद आहे. अजूनही काही ठिकाणी ही यंत्रणा नादुरुस्त असण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराशी आरोग्य विभागाने संपर्क साधला असता, तो होत नसल्याचे सांगण्यात येते.विजेची किती बचत झाली हेही गुलदस्त्यातचकोणताही प्रस्ताव सादर करताना चकाचक सादर करायचा; परंतु नंतर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून पुढे नेमके काय झाले हे पाहण्याची तसदी जिल्हा परिषदेत घेतली जात नाही. जिल्हा परिषदेशेजारील लॉन हे त्याचे उत्तम उदाहरण. याही प्रकल्पामध्ये ही सौरऊर्जा यंत्रणा बसवल्याने किती वीज बचत होणार याचे त्रैराशिक चांगले मांडले गेले; परंतु गेली दोन वर्षे झाली कोणत्या आरोग्य केंद्राची, किती रुपयांची वीज बचत झाली, हे मात्र आरोग्य विभागालाही माहीत नाही.याआधीच ठेकेदाराला दंडमुळात ठेका दिल्यानंतर ज्या मुदतीत ही यंत्रणा आरोग्य केंद्रांवर बसवण्याची अट घातली होती, त्या मुदतीत ही यंत्रणा न बसल्याने लोकल फंड आॅडिटने ६ लाख १८ हजार १५0 रुपये दंड ठेकेदाराला केला होता. आताही ठेकेदार दाद देत नसल्याने या पाच केंद्रांवरील ही यंत्रणा बंद आहे. हा मुद्दा सर्वसाधारण सभेतही उपस्थित करण्यात आला होता. या ठेकेदाराची नऊ लाख ७५ हजार बयाणा रक्कम जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदMedicalवैद्यकीय