शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दहावीचा गुरुवारी पहिला पेपर, दीड लाख परीक्षार्थी; भरारी पथकांची राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:37 IST

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरने सुरूवात होणार आहे. यावर्षी कोल्हापूर विभागात यावर्षी नियमित आणि पुर्नपरीक्षार्थी असे एकूण १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

ठळक मुद्दे दहावीचा गुरुवारी पहिला पेपर दीड लाख परीक्षार्थी; भरारी पथकांची राहणार नजर

कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरने सुरूवात होणार आहे. यावर्षी कोल्हापूर विभागात यावर्षी नियमित आणि पुर्नपरीक्षार्थी असे एकूण १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

पहिल्या पेपरच्या तयारीसाठी बुधवारी विद्यार्थी अभ्यासात गुंतले होते. काहींनी परीक्षा केंद्रांवर जावून आपला क्रमांक त्याच ठिकाणी आहे का? याची खात्री करून घेतली. परीक्षा केंद्रात सकाळी साफसफाई आणि पेपरची तयारी सुरू होती.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी कोल्हापुरातील विभागात असणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी विभागातील १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे.

 गुरुवारी सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपर परीक्षेला सुरुवात होईल. परीक्षेतील कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात शिक्षण मंडळातर्फे एकूण १९ भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे.

अधिकृत वेळापत्रक पहावेपरीक्षार्थींनी शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रक पाहावे. सोशल मीडियावरून फिरत असलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी केले आहे. सचिव पवार म्हणाल्या, परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे.

परीक्षा केंद्रांवर पेपरच्या आधी अर्धा तास परीक्षार्थींनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी अकरा वाजता पेपर असणाºया परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल. त्यांना १० वाजून ४० मिनिटांनी उत्तरपत्रिका आणि १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात येईल. त्यांना अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल.

जिल्हानिहाय परीक्षार्थीजिल्हा                      नियमित                          पुर्नपरीक्षार्थीकोल्हापूर                   ५९,८४०                             १३१६सांगली                      ४३,७१५                             १६८५सातारा                      ४२,३६१                             १४५८ 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूर