शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ...अखेर दिव्यांग अ‍ॅथलिट ‘अजय’ ला मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 11:54 IST

दिव्यांग अ‍ॅथलिट अजय सखाराम वावरे याला त्याने बंगलोर येथे राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र पडताळणी करून हवे होते. मात्र, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या प्रभारी कारभारामुळे त्याला अनेक महिने हेलपाटे मारावे लागले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेरीस त्याला सोमवारी क्रीडा कार्यालयाने प्रमाणपत्र पडताळणी करून दिले.

ठळक मुद्दे...अखेर दिव्यांग अ‍ॅथलिट ‘अजय’ ला मिळाला न्याय‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : दिव्यांग अ‍ॅथलिट अजय सखाराम वावरे याला त्याने बंगलोर येथे राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र पडताळणी करून हवे होते. मात्र, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या प्रभारी कारभारामुळे त्याला अनेक महिने हेलपाटे मारावे लागले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. अखेरीस त्याला सोमवारी क्रीडा कार्यालयाने प्रमाणपत्र पडताळणी करून दिले.दिव्यांग खेळाडू अजयने बंगलोर येथे सन २०१२ मध्ये राष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली होती. दिव्यांग खेळाडूंना नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण असल्याने त्याने जुलै २०१८ मध्ये कोल्हापुरातील क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी दिले होते. मात्र, वारंवार वेगवेगळी कारणे व योग्य कागदपत्रे नसल्याचे कारण देऊन माघारी पाठविले जात होते.

अजयसाठी त्याची आई कल्पना या सातत्याने कार्यालयाच्या फेऱ्या मारत होत्या. प्रत्येक वेळी वेगळी कारणे दिली जात होती. यात कधी उपसंचालक नसल्याचे, तर कधी कागदपत्रांत त्रुटी असल्याचे सांगून माघारी पाठविले जात होते. सर्व कागदपत्रांचीपूर्तता केल्यानंतर मागील महिन्यात पॅरा असोसिएशनचे पत्र मागितले. तेही अजयच्या आईने कार्यालयात जमाही केले तरीही पुन्हा तोच पाढा वाचला जात होता.

याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर पुन्हा यंत्रणा गतिमान झाली. अखेरीस क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून सोमवारी दुपारी अजयची आई कल्पना यांना बोलावून प्रमाणपत्र पडताळणीचे पत्र दिले. 

प्रत्येक वेळी कार्यालयाकडून वेगवेगळी कारणे देऊन मला माघारी पाठविले जात होते. त्यात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आणि यंत्रणा गतिमान झाली. सोमवारी मला कार्यालयाने बोलावून पडताळणीचे पत्र दिले. हे केवळ ‘लोकमत’मुळे शक्य झाले.कल्पना वावरे, दिव्यांग अ‍ॅथलीट अजयची आई 

 

टॅग्स :Lokmatलोकमतkolhapurकोल्हापूर