शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  अखेर अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक सादर, विधानसभेत होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:37 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर झाले. कोल्हापुरकरांकडून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून शासनाने हे विधेयक सादर केले असून त्यावर आज बुधवारी चर्चा होवून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक सादरविधानसभेत होणार चर्चा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नियुक्ती विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर झाले. कोल्हापुरकरांकडून गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून शासनाने हे विधेयक सादर केले असून त्यावर बुधवारी चर्चा होवून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी दि. ९ जून २०१७ रोजी अंबाबाई मूर्तीला घागरा-चोलीचा पेहराव केल्यानंतर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनाला सुरवात झाली. पंढरपूर, शिर्डी, सिद्धीविनायक या मंदिरांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातही शासकीय पगारी पुजारी नेमण्यात यावेत या मागणीसाठी हे जनआंदोलन उभारले.

परिणामी त्यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे याबाबत सुनावणी घेतली जावी, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील तीन महिन्यात मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करू असे आश्वासन दिले होते. तेंव्हापासून गेले नऊ महिने अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे.

दरम्यान आमदार राजेश क्षिरसागर यांनीही लक्षवेधीद्वारे हा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावर उत्तर देताना विधी व न्याय मंत्री रणजित पाटील यांनी कायदा तयार करण्यासाठी स्वतंत्र शासकीय समितीची नेमणूक करण्यात आली असून पुढील तीन महिन्यात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करू अशी घोषणा केली होती.अखेर तीन महिने, दोन महिने, पंधरा दिवस, पून्हा तीन महिने असा आश्वासनांचा, दिवस आणि महिन्यांचा प्रवास करत मंगळवारी दुपारी विधानसभा विधेयक क्रमांक ३३ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे विधेयक संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी सादर केले. या विधेयकावर आणि त्यातील मसुद्यावर बुधवारी चर्चा होईल.

या चर्चेतील मुद्दे, आमदारांनी सुचवलेल्या सुचना अशा सर्व बाबींचा विचार करून त्यावर शिक्कामोर्तब होईल. विधानसभेनंतर त्यावर विधीमंडळात चर्चा होईल. तेथेही विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर राज्यपाल अधिसुचना काढतील, त्याचे गॅझेट झाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचे विधेयक सादर होणे हे कोल्हापुरकरांच्या लढ्याचे यश आहे. विधेयकावर बुधवारी चर्चा होईल. मी स्वत: या चर्चेत भाग घेणार आहे. त्यात काही चुकीच्या तरतुदी असतील तर दुरुस्ती, येथील पूजाऱ्यांनाही सिद्धीविनायक, पंढरपूर येथील पूजाऱ्यांइतकाच पगार दिला जावा अशी मागणी करणार आहे.आमदारराजेश क्षीरसागर

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर