शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:43 IST

पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

ठळक मुद्देपाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी परिसरात पाहिलीच घटना; शेतकरी वर्गात कमालीची भिती

धामोड/कोल्हापूर : पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

या घटनेबद्दलची अधिक माहिती अशी केरबा म्हादू पाटील हे आपल्या 'पलंगीचा माळ ' नावाचा शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते . गावाला लागूनच शेत व शेताला लागूनच जंगल असल्याने लोकांना गव्याचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागत असतो.

पण असे असले तरी दिवसाच्या वेळी आजअखेर गव्यांनी कधीच दर्शन दाखवले नव्हते. आज मात्र केरबा पाटील हे सकाळी ११ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता. ऊसामध्ये दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांचावर अचानक हल्ला चढवला . त्यांना काहीच कळण्याच्या आत पुन्हा -पुन्हा गव्याने धडक मारल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले .त्यात त्यांचा मांडीवर तसेच छातीवर गव्याने जोरदार धडक दिल्याने बरगडीला गंभीर जखम झाली . ते गव्याचा धडकेने लांबवर फेकले गेल्याने डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ पूढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलवले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे . दरम्यान दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. सरदार पाटीलमुळेच केरबा जाधवांना जीवनदानसरदार बाबू पाटील हा तरुण याच दरम्यान आपल्या शेताकडे ऊसाला पाणी देण्यासाठी चालला होता . तेंव्हा त्याला बांधाच्या कडेला कोणाच्या तरी कणण्याच्या( विव्हळणे )आवाज आला . त्याने त्या दिशेने तात्काळ धाव घेतली व घडला प्रकार त्याने पाहीला. हातातील पाणी जाधव यांच्या तोंडात घातले व क्षणाचाही विलंब न लावता गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना ही घटना सांगितल्यांनेच केरबा जाधवांना प्राण वाचले, अन्यथा अनर्थ घडला असता.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर