शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकाला अनन्यसाधारण महत्त्व : न्हावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:37 IST

न्यायालयात जलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकांच्या कामाला अनन्य साधारण महत्त्व आहे. लघुलेखकांनी आपले काम अत्यंत प्रभावी होण्यासाठी भाषा आणि व्याकरण आत्मसात केले पाहिजे. त्यामुळे जलद न्यायनिर्णय टंकलिखित करणे सोपे जाईल, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र व न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देजलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकाला अनन्यसाधारण महत्त्व : न्हावकरलघुलिपीचे जनक आयजॅक पिटमन यांचा जन्मदिवस

कोल्हापूर : न्यायालयात जलद न्यायदान प्रक्रियेत लघुलेखकांच्या कामाला अनन्य साधारण महत्त्व आहे. लघुलेखकांनी आपले काम अत्यंत प्रभावी होण्यासाठी भाषा आणि व्याकरण आत्मसात केले पाहिजे. त्यामुळे जलद न्यायनिर्णय टंकलिखित करणे सोपे जाईल, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र व न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी येथे व्यक्त केले.लघुलिपीचे जनक आयजॅक पिटमन यांच्या जन्मदिनानिमित्त लघुलेखकदिन प्रसंगी शुक्रवारी (दि. ४) जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एन. व्ही. न्हावकर यांनी पिटमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यावेळी न्हावकर म्हणाले, जलद न्यायदान प्रक्रियेत संगणक प्रणाली आत्मसात करणे फार महत्त्वाचे ठरते. पूर्वीच्या टंकलेखन यंत्राऐवजी संगणक प्रणालीमुळे लघुलेखकांच्या कामात गती प्राप्त झाली आहे. हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्व लघुलेखकांनी संगणक प्रणालीचे काम करीत खोलवर अभ्यास करायला हवा, तरच पक्षकारांना एका क्लिकवर त्यांच्या न्यायिक प्रकरणामध्ये न्यायिक आदेश यांची माहिती, तसेच त्यांचे प्रकरण कोणत्या स्टेजवर आहे, हे त्यांना समजू शकणार आहे. त्यामुळे न्यायदान प्रक्रियेतील पारदर्शकता दिसण्यास मदत होणार आहे. यानंतर न्हावकर यांनी सर्व लघुलेखकांना चांगले काम करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा न्यायाधीश अमित शेटे, प्रबंधक दीपक जाधव, लघुलेखक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गुजर उपस्थित होते. अभिजित गायकवाड यानी प्रास्ताविक केले. काशिद यांनी सूत्रसंचालन केले. तर श्रीकांत सुतार यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर