शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूर : ‘अवती-भवती’ चित्रप्रदर्शन रविवारपासून, ५० कलाकृती, प्रदर्शन १७ तारखेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:21 IST

कोल्हापूर येथील गुरू-शिष्य परिवारातर्फे प्रसिद्ध चित्रकार विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे ‘अवती-भवती’ हे प्रदर्शन रविवार (दि. ११)पासून राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ‘अवती-भवती’ चित्रप्रदर्शन रविवारपासून५० कलाकृती, प्रदर्शन १७ तारखेपर्यंत

कोल्हापूर : येथील गुरू-शिष्य परिवारातर्फे प्रसिद्ध चित्रकार विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे ‘अवती-भवती’ हे प्रदर्शन रविवार (दि. ११)पासून राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.रेखासम्राट टी. के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगांवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार, विलास बकरे, कॅडसन लॅबचे शशिकांत कदम, डॉ. संदीप पाटील, कोल्हापूर वुई केअरचे मिलिंद धोंड, प्राचार्य अजेय दळवी उपस्थित असतील.

चित्रकला, रंगावली, छायाचित्र, लेखन अशा विविध कलाक्षेत्रांसह समाजसेवेतही ठसा उमटवलेल्या विजय टिपुगडे यांच्या ‘अवती-भवती’ या चित्रप्रदर्शनातील कलाकृती मराठी मातीचे विलोभनीय दर्शन घडणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेला निसर्ग, गर्द वनराई, खळाळते धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मातीशी इमान सांगणारे ग्रामीण जीवन याचे तितकेच पारदर्शी नितळ रूप कलाकृतींत साकारले आहे. कोकणचा समुद्रकिनारा, माडाची झाडे, तरंगत्या होड्यांची भुरळ सगळ्यांनाच पडते. हा लोभस कोकणही चित्रांंतून साकार झाला आहे.अचूक, वास्तवदर्शी रेखाटन, पारदर्शी जलरंगाचे ओघवते लेपन ही वैशिष्ट्ये घेऊन या ५० कलाकृती साकारल्या आहेत. हे प्रदर्शन १७ तारखेपर्यंत सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ या कालावधीत खुले राहणार असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक