शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मनपा प्रभाग समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:48 IST

कोल्हापूर महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत.

ठळक मुद्देमनपा प्रभाग समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी बुधवारी नामनिर्देशनपत्रे भरणार

कोल्हापूर : महानगरपालिकेतील चार प्रभाग समिती सभापतींची निवडणुक शुक्रवारी होत असून त्याकरीता इच्छुकांनी बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत नामनिर्देशनपत्रे भरायची आहेत.

विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ३ अंतर्गत असलेल्या प्रभाग समितींवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे निर्विवाद बहुमत असल्याने तेथे या आघाडीचे उमेदवार सभापती होतील मात्र विभागीय कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत प्रभाग समितीवर कॉँग्रेस -राष्ट्रवादीचे १० व भाजप - ताराराणी आघाडीचे १० असे समान बलाबल असल्याने चिठ्ठी टाकून निर्णय होणार आहे.प्रभाग समिती सभापती म्हणून ज्यांना संधी दिली जाते, त्यांना अन्य पदे देताना बाजूला ठेवले जाते असा समज असल्याने सहसा प्रभाग समिती सभापतीपदासाठी चढाओढ होत नाही. यावेळी देखील अशीच परिस्थिती आहे. सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी दोन्ही आघाडीच्या पातळीवर शांतता आहे.सध्या गांधी मैदान प्रभाग समितीवर प्रतिक्षा पाटील, राजारामपुरी विभागीय कार्यालय समितीवर छाया पोवार तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभाग समितीवर सुरेखा शहा सभापती असून तिघेही कॉँग्रेसचे आहेत.

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभाग समितीवर राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे सभापती आहेत. त्यापैकी पाटील, पोवार व पिरजादे हे गेल्या दोन वर्षापासून सभापतीपदावर कायम आहेत.यावेळी राष्ट्रवादीकडून अजझल पिरजादे यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांनी स्थायी सभापती निवडणुकीत पक्ष विरोधी मतदान केले असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही हे स्पष्ट आहे.

कॉँग्रेसकडून सुरेखा शहा यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद दिल्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळणार नाही. प्रतिक्षा पाटील व छाया पोवार यांना सलग तिसऱ्यांदा संधी मिळणार का हा उत्सुकतेचा विषय आहे.गतवर्षी निलेश देसाई यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे ताराराणी कार्यालयांतर्गत प्रभाग समिती कॉँग्रेसच्या ताब्यात आली होती. परंतु देसाई यांच्या जागी रत्नेश शिरोळकर निवडून आल्याने तेथे १० - १० असे समान बलाबल असल्याने चिठ्ठी टाकून निर्णय होणार आहे. यापूर्वी या समितीवर राजसिंह शेळके (ताराराणी) यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली होती. बुधवारी सकाळी सभापती पदाचे उमेदार निश्चित केले जाणार आहेत. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर