शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: देवदेवतांचे फोटो, ई-कचरा गोळा करण्याचे व्रत; ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’चा उपक्रम 

By भीमगोंड देसाई | Updated: January 1, 2025 15:14 IST

२० कार्यकर्ते राबतात आपल्या शहरासाठी

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’तर्फे गेल्या तीन वर्षांपासून ई-कचरा संकलन आणि स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केला आहे. सध्या ते दर महिन्याच्या २३ तारखेला शहरातील एका भागात सकाळी एक तास स्वच्छता करतात. रंकाळा टॉवरजवळील महापालिकेच्या दुकान गाळ्यात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ९ ते १२ पर्यंत ई-कचरा, टाकाऊ देव, देवतांचे फोटो, पुस्तके प्लास्टिक संकलित केले जाते. संकलित होणारा कचरा पुनर्निर्मितीसाठी सांगली येथील संस्थेकडे पाठवला जातो. संस्थेच्या या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेला हातभार लागत आहे.

कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे पर्यावरण संरक्षण, रक्षणासाठी काम करते. यामध्ये २० कार्यकर्ते सक्रियपणे काम करतात. चार वर्षांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवते. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांतून एक दिवस बिंदू चौक, गंगावेस, राजारामपुरी आईचा पुतळा, क्रशर चौक येथे ई-कचरा, खराब झालेले देवदेवतांचे फोटो, मूर्ती, पुस्तकांचे संकलन करण्यात येत होते. यातून सुमारे एक हजार किलो ई-कचरा गोळा होत होता. याला प्रतिसाद मिळत राहिल्याने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी महापालिकेने दिलेल्या दुकान गाळ्यात कचरा संकलन केले जाते. एक वर्षापासून हा उपक्रम निरंतरपणे सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात ५०० किलोपर्यंत कचरा एकत्र होतो. यामध्ये प्रामुख्याने खराब झालेले टीव्ही, संगणक, असा ई-कचरा मोठ्या प्रमाणात असतो. हा कचरा उघड्यावर टाकल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होतात. म्हणून हा सर्व कचरा वॉरियर्सतर्फे काटेकोरपणे संकलित केला जातो. यांनी सुरू केलेल्या केंद्रामुळे ई-कचरा देऊ इच्छिणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. अर्थ वॉरियर्सचे आशिष कोंगळेकर, अभिजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत.

शाळा, महाविद्यालयांत प्रबोधनपर्यावरणपूरक उपक्रम, उघड्यावर प्लास्टिक, ई-कचरा टाकल्यानंतर पर्यावरणावर, मानवी वस्तीवर कोणते परिणाम होतात, याचे प्रबोधन अर्थ वॉरियर्सतर्फे केले जात आहे. यावेळी शाळा, कॉलेज, महाविद्यालयांनाही प्लास्टिक, ई-कचरा संकलन केंद्र सुरू करावे, असे आवाहनही केले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर