शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘ई-डिस्निक प्रणाली’चे रुपडे पालटणार, दोन महिन्यांत नवीन वेबसार्ईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:07 IST

लोकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणाऱ्या जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावण्यांबाबत सध्या कार्यान्वित असलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीचे रुपडे आता पालटणार आहे. त्या दृष्टीने यामध्ये नवीन बदल करण्याचे काम राष्ट्रीय  सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या कोल्हापूर विभागातर्फे सुरू आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होऊन ‘ई-डिस्निक’ प्रणालीची  नवीन वेबसाईट अस्तित्वात येऊन तिचे काम सर्व शासकीय विभागांत व देशभर चालणार आहे. यामधून महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांचे कामकाज होणार आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांत नवीन वेबसार्ईट अस्तित्वात येणार प्रायोगिक तत्वावर पुणे विभागात काम सुरु महसूलसह सर्व शासकीय विभागांमध्ये होणार कामकाजझिरो पेंडन्सी अ‍ॅँड डेली डिस्पोजल प्रणालीद्वारे काम

प्रवीण देसाई

कोल्हापूर : लोकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणाऱ्या जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावण्यांबाबत सध्या कार्यान्वित असलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीचे रुपडे आता पालटणार आहे. त्या दृष्टीने यामध्ये नवीन बदल करण्याचे काम राष्ट्रीय  सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या कोल्हापूर विभागातर्फे सुरू आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होऊन ‘ई-डिस्निक’ प्रणालीची  नवीन वेबसाईट अस्तित्वात येऊन तिचे काम सर्व शासकीय विभागांत व देशभर चालणार आहे. यामधून महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांचे कामकाज होणार आहे.

ई-डिस्निक प्रणाली ही सात वर्षांपूर्वी ‘एनआयसी’च्या कोल्हापूर विभागातर्फे विकसित करण्यात आली. ती लोकाभिमुख झाल्याने संपूर्ण राज्यभरात स्वीकारण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील महसूल विभागातील ६६८ कार्यालयांमध्ये या प्रणालीच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर चालणारे कामकाज तसेच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोरील न्यायालय (रेव्हेन्यू कोर्ट) व त्यातून ‘एसएमएस’द्वारे पक्षकार व वकिलांना मिळणारे संदेश यांमुळे या प्रणालीद्वारे लोकांचा वेळ आणि पैसा वाचत आहे. आता या ‘ई-डिस्निक’ प्रणालीचे रुपडे पालटणार आहे.

सध्या महसूल विभागाच्या कामकाजापुरती मर्यादित असणारी ही प्रणाली व्यापक करून ती सर्व शासकीय विभागांसाठी वापरता यावी यासाठी हालचाली सुरू आहेत. या प्रणालीचे पुढचे पाऊल म्हणून नवीन वेबसाईट तयार केली जात आहे.

दोन महिन्यांत याच्या पडताळणीचे काम पूर्ण होऊन महसूलसह जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस विभागांबरोबरच अन्य शासकीय विभागांमध्ये या प्रणालीद्वारे ‘झिरो पेंडन्सी’सह विविध कामकाज सुरू होऊन ते देशभर जाणार आहे. त्याचे नियंत्रण कोल्हापूर ‘एनआयसी’कडून केले जाणार आहे. पूर्वी हे काम फक्त महसूल विभाग व महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित होते.

पुणे विभागात प्रायोगिक तत्त्वावर झिरो पेंडन्सी अ‍ॅँड डेली डिस्पोजल प्रणालीद्वारे काम सुरूनवीन वेबसाईटचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी ‘एनआयसी’ने प्रायोगिक तत्त्वावर झिरो पेंडन्सी अ‍ॅँड डेली डिस्पोजल ही प्रणाली सध्याच्या ई-डिस्निक प्रणालीवर ‘एनआयसी’ने उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे पुणे महसूल विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभागांत झिरो पेंडन्सीचे काम सुरू केले आहे. नवीन वेबसाईट सुरू झाल्यावर त्यामध्ये वरील प्रणाली वर्ग करण्यात येणार आहे.

 

‘ई डिस्निक’प्रणालीमध्ये नवे बदल करून नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम सुरू आहे. पूर्वी महसूल व महाराष्ट्रापुरती मर्यादित असणारी ही प्रणाली सर्व शासकीय विभागांना उपयोगी पडेल, या दृष्टीने तिची रचना केली जात आहे. ही वेबसाईट पूर्ण व्हायला दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून, तिचा वापर संपूर्ण देशभरात करता येणार आहे.- चंद्रकांत मुगळी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी,राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, कोल्हापूर.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार