शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दिलबहार(अ) ची ‘संध्यामठ’वर एकतर्फी मात, के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग; निखिल जाधवचे दोन गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 15:47 IST

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले. शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला.

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ (अ) संध्यामठ तरुण मंडळावर २-० अशी एकतर्फी मात केली. दोन्ही गोल ‘दिलबहार’च्या निखिल जाधवने केले.शाहू स्टेडियम येथे रविवारी दिलबहार (अ) व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला.

सामन्यांच्या सुरुवातीपासूनच ‘दिलबहार’कडून सनी सणगर, जावेद जमादार, किरण चोकशी, इमॅन्युअल इचिबेरी, निखिल जाधव यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे तिसऱ्या मिनिटास सनी सणगरच्या पासवर निखिल जाधवने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली.

या गोलनंतर ‘संध्यामठ’कडून आशिष पाटील, सौरभ हारुगले, मोहित मंडलिक, सतीश अहीर, अजिंक्य गुजर, शाहू भोईटे यांनीही सामन्यात बरोबरी करण्यासाठी वेगवान चाली रचल्या. मात्र, ‘दिलबहार’च्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

‘दिलबहार’कडून किरण चोकशीच्या पासवर इमॅन्युअल इचिबेरी, निखिल जाधव यांच्या संधी वाया गेल्या; तर ‘संध्यामठ’कडून अजिंक्य गुजरच्या पासवर सतीश अहीरच्या दोन संधी वाया गेल्या. ३८ व्या मिनिटास ‘दिलबहार’कडून इमॅन्युअल इचिबेरीने दिलेल्या पासवर निखिल जाधवने संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवीत आघाडी भक्कम केली.कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे के. एस. ए.तर्फे रविवारी सायंकाळी शाहू छत्रपती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शाहू छत्रपती यांनी केक कापला. यावेळी खासदार संभाजीराजे, दीपक शेळके, सरदार मोमीन, माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, आदी मान्यवर उपस्थित होते.उत्तरार्धात ‘संध्यामठ’कडून शाहू भोईटे, अजिंक्य गुजरच्या पासवर सौरभ हारुगलेची संधी वाया गेली; तर ‘दिलबहार’कडून किरण चोकशीचा फटका गोलपोस्टवरून गेल्याने गोल करण्याची संधी वाया गेली. तसेच त्यांच्याकडून आघाडी वाढविण्यासाठी प्रयत्न झाला.

मात्र, सजग असलेल्या ‘संध्यामठ’च्या बचावफळीने त्यांचे आघाडी वाढविण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरविले. अखेरच्या काही क्षणांत ‘दिलबहार’कडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. अखेरीस हा सामना २-० या गोलसंख्येवर दिलबहार (अ)ने जिंकला.

स्पर्धेच्या मध्यंतरामध्ये के.एस.ए.चे पेट्रन चीफ शाहू छत्रपती यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजे, के.एस.ए.चे अध्यक्ष सरदार मोमीन, माणिक मंडलिक, संभाजी मांगोरे-पाटील, नितीन जाधव, संजय पोरे, झुंजार सरनोबत, दीपक शेळके, बाबा पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल