शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजू शेट्टींच्या निष्क्रियतेमुळेच पाणीसंघर्ष - धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 17:55 IST

पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकातून केली आहे.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या निष्क्रियतेमुळेच पाणीसंघर्ष - धैर्यशील मानेताकदीने प्रयत्न शेट्टी यांनी केलेच नाहीत

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी केली आहे.पंचगंगेतील दूषित पाण्याने हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील अनेकांचे जीव घेतले आहेत. दूषित पाण्यात मिसळणाऱ्या रसायनांमुळे त्वचारोग, कॅन्सर आजाराने ग्रासले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केली असती तर लोकांच्या जिवाशी खेळ झाला नसता.

जिल्हा परिषदेने २४ फेबु्रवारी २०१४ रोजी ३० गावांचा सांडपाणी व सहा गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा १०८ कोटींचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. पर्यावरण विभागाने शिफारशीसह नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय वने व पर्यावरण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला.

तो वेगवेगळी कारणे दाखवून नाकारण्यात आला. पंचगंगा प्रदूषण व उपाययोजनेबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर खासदार म्हणून ताकदीने प्रयत्न होणे गरजेचे होते, ते राजू शेट्टी यांनी केलेच नाहीत. जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करून निधी आणला असता तर आज पाण्यासाठी ‘ग्रामीण विरुद्ध शहरी’ असा संघर्ष झाला नसता, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर