शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्ताप, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:47 IST

दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देपॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्तापग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन

कोल्हापूर : दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.दिवाळी बुधवारी असल्याने घराघरांत फराळ करण्याचे काम सुरू आहे. रेशनवर गहू, तूरडाळ, तांदूळ व साखर मिळत असल्याने ते घेण्यासाठी गेल्या दोन-चार दिवसांपासून दुकानांसमोर रांगा लागल्या आहेत; परंतु सोमवारी सकाळपासून रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. सर्वच व्यवहार या मशीनवर असल्याने ते सुरू झाल्याशिवाय धान्य वितरण करणे शक्य नाही. दुकानात धान्य आहे परंतु ते वाटप करता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.

सर्व्हर डाऊनमुळे ई-पॉस मशीनवर अशाप्रकारे तांत्रिक अडथळ्यांचा संदेश येत होता. 

अधिक माहिती घेतल्यानंतर ई पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्याचे समजले. काहीवेळांतच तो पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम होत्या. दुपारपर्यंत ही मशीन बंद राहीली. ऐन दिवाळीत शासनाच्या या गलथानपणाबद्दल ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आम्ही फराळ कधी करायचा, किती वेळ थांबायचे, अशा भावना महिला ग्राहकांनी व्यक्त केल्या. सरकारबरोबरच सर्व रोष दुकानदारांवर व्यक्त होत होता.

यावर आम्हाला धान्य द्यायला काहीच अडचण नाही, परंतु सर्व्हर डाऊनमुळे मशीन बंद असल्याने ते देता येत नसल्याचे दुकानदांकडून सांगण्यात येत होते. हे सांगत असताना त्यांची चांगलीच कसरत होत होती. अखेर दुपारनंतर ही मशीन पूर्ववत सुरू झाल्याने धान्य वितरणास सुरुवात झाली. धान्य घेण्यासाठी अर्धा दिवस ताटकळत थांबलेल्या ग्राहकांच्या रांगा सायंकाळपर्यंत कायम राहिल्या.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर