शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : औषध दुकानदारांचा शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:00 IST

औषधांच्या आॅनलाईन विक्री, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस्नी आज, शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारल्याचे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्टस अ‍ॅँड ड्रगिस्टस (एआयओसीडी)चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्देऔषध दुकानदारांचा शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी बंदमध्यरात्रीपासून बंद; कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनचा सहभाग

कोल्हापूर : औषधांच्या आॅनलाईन विक्री, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस्नी शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारल्याचे आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्टस अ‍ॅँड ड्रगिस्टस (एआयओसीडी)चे अध्यक्ष जे. एस. शिंदे यांनी जाहीर केल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली आहे.प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेली कोणताही आदेश किंवा ई-फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्टसनी एक दिवसाचा ‘बंद’ पुकारलेला आहे.

‘एआयओसीडी’ने निदर्शनास आणलेल्या अनेक गंभीर मुद्द्यांमधील या समस्येमुळे संस्थेतील सदस्यांना त्यांच्या व्यवसायात नुकसान होणार आहे. औषधांची आॅनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतात. याबाबत जागरूकता आणण्यासाठी भारतातील सर्व केमिस्टस्नी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्री बारापासून शुक्रवारी रात्री बारापर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

अत्यावश्यक औषधे उपलब्धकोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्टस असोसिएशनतर्फे ‘बंद’ काळात रुग्णांना अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी असोसिएशनच्या केमिस्ट भवन, केव्हीज प्लाझा, स्टेशन रोड येथे संपर्क साधावा; तसेच अधिक माहितीसाठी ०२३१-२६५६६०९ येथे संपर्क साधावा. अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे सचिव शिवाजी ढेंगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :medicinesऔषधंkolhapurकोल्हापूर