शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : केशवरावांचे चित्र काढणार, पुतळ्याचेही नियोजन, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 11:20 IST

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देकेशवरावांचे चित्र काढणार, पुतळ्याचेही नियोजन नाट्यगृहासाठी महापालिकेकडून पाठपुरावा‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.‘केशवरावचा प्रस्ताव रेंगाळला’ या मथळ्याखाली रविवारी (दि. १७) ‘लोकमत’मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्यानंतरची स्थिती व त्यातील त्रुटी मांडण्यात आल्या होत्या. त्यांत केशवराव भोसलेंचे छतावर अडकविलेले चित्र, नियोजनात केशवरावांची माहिती व पुतळ्याचा समावेश नसल्याचे मांडण्यात आले होते.

दरम्यान, रंगकर्मींनीही दूरध्वनीद्वारे आम्ही महापालिकेकडे याविषयी वारंवार चर्चा केली आहे. मात्र प्रतिसाद आला नसल्याचे सांगितले.मंगळवारी याविषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केशवराव भोसलेंचे छतावर अडकविलेले चित्र काढणार असल्याचे सांगितले. वास्तूच्या अंतर्गत डिझाईनमध्ये हे चित्र लावण्यासाठी सुयोग्य जागा नसल्याने ते छतावर लावण्यात आले.

ते खूप उंच असल्याने चित्र काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा मागवावी लागणार आहे; त्यामुळे शक्य तितक्या लवकर चित्र काढून दर्शनी भागात लावले जाईल. नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात पुतळ्यांचे एकत्रीकरण व सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यात केशवरावांच्या पुतळ्याचा समावेश केला जाईल, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरणाच्या प्रस्तावाबाबतही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाTheatreनाटकcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर