शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बालकांच्या आरोग्य बांधीलकीबद्दल सरकारवरील संशयास वाव : पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:40 IST

राज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्यविषयक बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. मनुष्यबळ विकास, आरोग्य व कुटुंबकल्याण, महिला व बालविकास यांच्याकरिता लागणाऱ्या निधी वाटपाच्या टक्केवारीत एकूण खर्चाच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असल्याचे माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देलोकसंख्येला सुविधा देण्यास कमी पडल्यास गंभीर संकटडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात प्रतिपादन अन्नसुरक्षा कायदा लागू करूनही अभिवचनाची पूर्तता होत नाही

कोल्हापूर : राज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्यविषयक बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. मनुष्यबळ विकास, आरोग्य व कुटुंबकल्याण, महिला व बालविकास यांच्याकरिता लागणाऱ्या निधी वाटपाच्या टक्केवारीत एकूण खर्चाच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असल्याचे माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे सांगितले.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, मनुष्यबळ हे चांगल्या प्रतीचे नाही, या कारणास्तव याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आर्थिक सुधारणांतून राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञानातील प्रगती व इतर बाबी तसेच सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मनुष्यबळावरच सर्व काही विसंबून आहे.

अधिक लोकसंख्या जरी लाभदायक, अभिमानाची बाब असली तरी अशा प्रचंड लोकसंख्येला आपण सुविधा देण्यात कमी पडल्यास आपणास गंभीर संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. डॉक्टर आणि प्रशासन यांनी सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून सार्वजनिक रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण परतले पाहिजेत.

मला दु:ख होतंयसंसदेकडून अन्नसुरक्षा कायदा २०१३ हा जाणीवपूर्वक आपल्याला लागू करण्यात आला असून, निश्चित काही प्रमाणात प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना अन्नधान्य पुरविण्याची वचनपूर्ती करण्यात आली. यामध्ये गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या मुलांसाठी विशेष प्राधान्य देणारी तरतूद केलेली आहे.

वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी आधुनिक आहार मानके निर्दिष्ट करण्यात आली. मला दु: ख होतंय की, कायद्यानुसार दिलेल्या अभिवचनाची आज पूर्तता होत नाही, असे माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. 

 

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठkolhapurकोल्हापूर