शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘मानधन नको, वेतन द्या’, आरोग्य परिचरांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा : द्वारसभेवेळी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:23 IST

‘मानधन नको, वेतन द्या, सेवेत कायम करा’ अशा घोषणा देत सोमवारी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आरोग्याधिकारी कुंभार यांना निवेदन दिले.

ठळक मुद्दे‘मानधन नको, वेतन द्या’, द्वारसभेवेळी निदर्शनेआरोग्य परिचरांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

कोल्हापूर : ‘मानधन नको, वेतन द्या, सेवेत कायम करा’ अशा घोषणा देत सोमवारी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निदर्शने केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आरोग्याधिकारी कुंभार यांना निवेदन दिले.ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेमार्फत खेडोपाडी आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये गेली ३० ते ४० वर्षे आरोग्य परिचर नि:स्वार्थी व प्रामाणिकपणे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.  या विभागात काम करणाऱ्या महिला या गरीब, परितक्त्या भूमिहीन व शेतमजूर आहेत. सध्या त्यांना दरमहा अवघे १२०० रुपये मानधन दिले जाते.

या तुटपुंज्या मानधनामध्ये शासकीय परिपत्रकाप्रमाणे सुमारे ६००० रुपयांपर्यंत वाढ करावी तसेच त्याचे वेतनात रूपांतर करावे, सेवेत कायम करावे, ७ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी, मानधनाची रक्कम थेट बँकेत जमा करावी, लसीकरणाबाबत सक्ती करू नये, आदी मागण्यांसाठी करवीर कामगार संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.येथील महावीर उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. हातात लाल निशाण घेऊन महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहोचल्यानंतर तेथे प्रवेशद्वारसभा घेण्यात आली.

यावेळी आरोग्य परिचर संघटनेचे अध्यक्ष बाबा यादव, दिलीप पवार, अ‍ॅड. बाळासाहेब पोवार यांनी भाषणात आरोग्य परिचरांच्या मागण्यांबाबत व्यथा मांडताना शासनाचा निषेध केला. त्यानंतर आरोग्याधिकारी कुंभार यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात दिलीप पवार, सुशीला यादव, एस. बी. पाटील, अ‍ॅड. बाळासाहेब पोवार, एम. बी. पडवळे, भगवान यादव, निर्मला श्ािंदे, सुमन कुंभार, बाळाबाई कांबळे, सुमित्रा कडचे, रत्नाबाई शिंदे, निर्मला परीट, रेश्मा नाईकवडी, आदींचा सहभाग होता.वाढीव मानधनाचा निर्णय अंतिम टप्प्यातमोर्चाच्या शिष्टमंडळाने आरोग्याधिकारी कुंभार यांच्याशी चर्चा केली असता आरोग्य परिचरांचे वर्षाचे पैसे शासनाकडून आले आहेत, ते लवकरच खात्यावर वर्ग करू, तसेच मानधनची रक्कम १२०० रुपयांवरून ६००० करण्याच्या मागणीवर निर्णय अंतिम टप्प्यात आहे, तोही निर्णय लवकरच होईल, असे कुंभार यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर