शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : फेरसर्व्हेक्षणात फेरीवाल्यांवर अन्याय नको, अन्यथा जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:04 IST

फेरसर्व्हेक्षणात अन्याय आणि भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, तर फेरीवाले रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील, असा इशारा येथे झालेल्या कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला.

ठळक मुद्देफेरसर्व्हेक्षणात फेरीवाल्यांवर अन्याय नकोअन्यथा जनआंदोलन : फेरीवाला बैठकीत इशारा

कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या फेरसर्व्हेक्षणात फेरीवाल्यांवर अन्याय केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जर अन्याय आणि भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, तर मात्र फेरीवाले रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील, असा इशारा येथे झालेल्या कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत सन २०१४ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता शहरातील फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण केले होते; मात्र त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्यामुळे आता फेरसर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात विचारविनियम करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.फेरसर्व्हेक्षण करण्याकरिता वॉर्डनिहाय ज्या फेरीवाला समिती नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये त्या त्या भागांत प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना योग्य प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काही समितींवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा समावेश नसल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त केली गेली.सन २०१४ मध्ये खासगी संस्थेमार्फत फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण झाले. त्यानंतर अनेक फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप करण्यात आले. आता फेरसर्व्हेक्षण करत असताना या बायोमेट्रिक कार्ड दिलेल्या फेरीवाल्यांचे काय करणार? अनेक फेरीवाले पात्र असूनदेखील मागील सर्व्हेक्षणात त्यांचा समावेश झालेला नाही त्यांचे काय करणार? असे प्रश्नही बैठकीत उपस्थित झाले.महानगरपालिका प्रशासन गेल्या पाच-सहा वर्षांपासून फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर काहीही करत नाही. फेरीवाल्यांना निश्चित कायमस्वरूपी जागा द्यावी, त्यांना सुविधा द्याव्यात, आदी मागण्यांबाबत वारंवार भेटी घेतल्या, चर्चा केल्या, आंदोलने केली; परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. यापुढे मात्र आम्ही गप्प बसणार नाही. नव्याने केल्या जाणाऱ्या फेरसर्व्हेक्षणात कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आतापासूनच प्रशासनाने घ्यावी, अशा भावना अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.बैठकीत माजी महापौर आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, सतीश कांबळे, भाऊसाहेब गणपुले, अशोक भंडारे, महंमद शरिफ शेख, किशोर घाडगे, किरण गवळी, सुरेश जरग, राजू जाधव, समीर नदाफ, मारुती भागोजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नितीन पाटील यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर