शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत एसटीचा कोल्हापूर विभाग मालामाल, 'इतक्या' कोटींचे उत्पन्न मिळाले

By सचिन भोसले | Updated: November 16, 2023 18:16 IST

कोल्हापूर : दिवाळीला एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूरातून पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, धाराशीव,कोकणसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांकरीता ९ नोव्हेंबरपासून ...

कोल्हापूर : दिवाळीला एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूरातून पुणे, मुंबई, सोलापूर, लातूर, धाराशीव,कोकणसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांकरीता ९ नोव्हेंबरपासून विशेष बस फेऱ्यांची सोय केली आहे. या अंतर्गत बुधवारी (दि.१५) पर्यंत या विभागाने १८ लाख ६२ हजार किलोमीटरचे अंतर पार करीत ६ कोटी ७१ लाखांचे उत्पन्न मिळवले.प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य राज्य परिवहन मार्ग महामंडळ अर्थात एस.टी.महामंडळाचे चालक, वाहक खऱोखरच सार्थ ठरवित आहेत. कोरोना कालावधीनंतर कर्मचारी पगार, निधी, बसची दुरुस्ती देखभाल आदीच्या खर्चामुळे शासन बंद करते की काय असा प्रश्न उभा राहीला होता. या दरम्यान अनेक उपाययोजना सुरु करण्यात आल्या. मात्र, सरकारला दरमहा पगारासाठी कोट्यवधी रुपये पगारासाठी महामंडळाला द्यावे लागत होते. सहा महिन्यांपुर्वी राज्य शासनाने खास महिलांकरीता तिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्यानंतर एस.टी.च्या बसेस अगदी हाऊसफुल्ल अशा ओसांडून वाहू लागल्या आहेत. यात ६५ वर्षावरील ज्येष्ठांनाही अशीच सवलत आहे. यासह ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना पुर्णपणे ही सेवाच मोफत करण्यात आली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून दिवसेंदिवस महामंडळाचे उत्पन्न वाढू लागले आहे. कोल्हापूर विभागाचा विचार करता ९ ते १५ नोव्हेंबर पर्यंत ६ कोटी ७१ लाख रूपयांचे उत्पन्न या विभागाने मिळवले आहे. हा ओघ अजूनही सुरुच आहे.

दिवाळी सुट्ट्याच्या कालावधीत प्रवाशांना सातत्याने बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विभागाला ६ कोटी ७१ लाखांचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे. - अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एस.टी.महामंडळ, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी 2023