शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागाने एस.टी.च्या कर्नाटककडे जाणाऱ्या ६६० फेऱ्या केल्या रद्द

By सचिन भोसले | Updated: December 7, 2022 16:06 IST

तासाभरातच पुन्हा कोगनोळी पोलिस ठाण्यातून बससेवा पुन्हा बंद कराव्यात, अशी सुचना करण्यात आली

कोल्हापूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा पुन्हा एकदा भडका उडाल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांनावर दगडफेक करून नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. दगडफेकीच्या या प्रकारानंतर काही काळ बंद झालेली एसटी वाहतूक सुरु झाली मात्र, आज बुधवारी सकाळी पुन्हा ती बंद करण्यात आली. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून जाणाऱ्या ३३० आणि येणाऱ्या ३३० अशा ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर सीमावादाला तोंड फुटले. यातच काल, मंगळवारी (दि.६) कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर दगडफेक केली. विशेषत: मालवाहतुकीसह एस.टी.महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीचे प्रकार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोगनोळी पोलिस ठाण्याच्या सुचनेनूसार मंगळवारी (दि.६) एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने कर्नाटककडे जाणारी बससेवा बंद केली. त्यानंतर आज, बुधवारी पहाटे कोगनोळी पोलिसांनी वातावरण शांत झाले असून आपण प्रवाशी सेवा पुर्ववत करू शकता असा संदेश आला. या संदेशानंतर कोल्हापूर विभागाने निपाणी, बेळगावकडे जाणाऱ्या बसेस सुरु केल्या. मात्र, तासाभरातच पुन्हा कोगनोळी पोलिस ठाण्यातून बससेवा पुन्हा बंद कराव्यात, अशी सुचना करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून ही सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून रोज कर्नाटककडे ये-जा करणाऱ्या एकूण ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. अशी माहिती विभागीय वाहतुक नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक