शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडील यंत्रणा होतेय हायटेक

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 1, 2025 14:10 IST

कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका, पाटबंधारे विभागांचा समावेश

इंदुमती गणेशकोल्हापूर : जिल्ह्याला वारंवार बसणारा महापुराचा फटका कमी व्हावा, किंबहुना तो बसूच नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील यंत्रणा हायटेक, डिजिटल करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, तसेच पाटबंधारे या तीन कार्यालयांचादेखील यामध्ये समावेश केला जाणार आहे. या महिन्यात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख कोल्हापुरात येणार असून, त्यावेळी यावर शिक्कामोर्तब हाेणार आहे.कोल्हापूरला गेल्या पाच वर्षांत तीनवेळा महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे महापुरावर कायमचा उपाय शोधण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ३ हजार कोटींचा प्रकल्प पुढील तीन वर्षांत राबविण्यात येत आहे. त्यासाठी बँकेची टीम पाच ते सहा वेळा कोल्हापुरात येऊन गेली आहे. सध्या या टीमकडून प्रकल्पाचा अहवाल तयार केला जात आहे. तसेच प्रकल्प राबविण्यासाठी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची चाचपणी केली जात आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कार्यालये हायटेक करून त्यांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.आपत्ती व्यवस्थापनचे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य कार्यालय, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका व पाटबंधारे विभाग अशा एकूण चार कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे.

हायटेक म्हणजे नेमके काय होणार?जीआयएस प्रणाली : महापुराचे एलइडी वॉलवर मॅपिंग, बाधित होणारा भाग, रस्ते यांचे मॅपिंग, त्याला पर्यायी रस्त्यांची माहिती. पाणी कोणत्या पातळीवर आले आहे याचे रिअल टाइम अपडेट, अतिवृष्टीचा इशारा, जीपीएस प्रणाली, बिनतारी संदेश यंत्रणा, पब्लिक ॲड्रेस सिस्टिमची कार्यक्षमता अधिक वाढवणे, सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा.सध्या हे सगळे काम मॅन्युअली म्हणजेच शासकीय यंत्रणेकडून अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून केले जाते; पण हायटेक डिजिटल यंत्रणा आली ती अधिक बिनचूक व तातडीने माहिती देईल.

मोबाइल व्हेइकल कंट्रोल रूम..कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव व जोतिबाची चैत्र यात्रा हे दोन महत्त्वाच्या धार्मिक उपक्रमांना लाखो भाविकांची गर्दी होते. शिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी यात्रा होत असतात. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, होत असल्यास तातडीने कळावे, यासाठी मोबाइल व्हेइकल कंट्रोल रूम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला दिले जाणार आहे. या वाहनातच आपत्ती व्यवस्थापनची सर्व यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, एलइडी, बचावाचे साहित्य असणार आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका, पाटबंधारे विभाग ही चार कार्यालये आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने हायटेक करण्याचा विचार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या महिन्यात कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीत यावर निर्णय होईल. - अमोल येडगे,जिल्हाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर