शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशन निवडणूक : १५ ला मतदान, सोमवारनंतर घडामोडींना वेग; दोन पॅनेल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 14:20 IST

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या घडामोडींना आता उन्हाळी सुटीनंतर म्हणजे सोमवार (दि. ४) नंतर वेग येणार असल्याचे दिसते. यासाठी १५ जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन पॅनेल होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे हे आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक : १५ ला मतदानसोमवारनंतर घडामोडींना वेग; दोन पॅनेल शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या घडामोडींना आता उन्हाळी सुटीनंतर म्हणजे सोमवार (दि. ४) नंतर वेग येणार असल्याचे दिसते. यासाठी १५ जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन पॅनेल होण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे हे आहेत.जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉइंंट सेक्रेटरी व लोकल आॅडिटर यांसह १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उन्हाळी सुटीमुळे बहुतांश वकील हे सुटीवर आहेत. गेल्या निवडणुकीत दोन पॅनेल झाली होती. त्याप्रमाणे यंदाही दोन पॅनेल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकील बांधव सातत्याने लढा देत आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे; पण सर्किट बेंचला अद्याप राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. प्रत्येक निवडणुकीत सर्किट बेंचचा मुद्दा असतो.

कसबा बावडा येथील नवीन न्यायसंकुल इमारतीतील कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये १५ जूनला सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान व त्यानंतर सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणार आहे. अ‍ॅड. सुभाष पिसाळ हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

असा राहणार निवडणूक कार्यक्रम :

  1. * वर्गणी भरणे -चार ते सहा जून,सायंकाळी ५ वा.पर्यंत
  2. * कच्ची मतदार यादी व त्यावरील हरकती - १० जून
  3. * पक्की मतदार यादी प्रसिद्ध - ११ जून, दुपारी ४ वा.
  4. * उमेदवारी अर्ज देणे व भरणे - ११ व १२ जून (सकाळी ११ ते दुपारी ४ वा.)
  5. * अर्ज छाननी व छाननीनंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध -१२ जून , दुपारी ४ वा.पर्यंत.
  6. *उमेदवारी अर्ज माघार - १३ जून, सकाळी ११ ते दुपारी ४ वा.पर्यंत
  7. *उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे - १३ जून, सायंकाळी ५ वा.
  8. * मतदान -१५ जून, सकाळी दहा ते दुपारी ४ या वेळेत
  9. * मतमोजणी व निकाल -१५ जून, २०१८. सायंकाळी सहा वाजल्यानंतर.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरadvocateवकिलElectionनिवडणूक