शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कोल्हापूर जिल्हा बॅँकेला ३३ कोटींचा निव्वळ नफा: स्वभांडवलही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:39 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ३७ लाखांचा नफा झाला आहे. बॅँकेने या वर्षात तब्बल ४०.८७ कोटींच्या तरतूद करत स्वभांडवल वाढविल्याने गतवर्षीच्या तुलनेत १0 कोटीने नफ्यात घट झाल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बॅँकेला ३३ कोटींचा निव्वळ नफा: स्वभांडवलही वाढले४०.८७ कोटींच्या तरतुदीमुळे गतवर्षीच्या तुलनेत नफ्यात घट

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ३७ लाखांचा नफा झाला आहे. बॅँकेने या वर्षात तब्बल ४०.८७ कोटींच्या तरतूद करत स्वभांडवल वाढविल्याने गतवर्षीच्या तुलनेत १0 कोटीने नफ्यात घट झाल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षभरात संचालक मंडळ व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काटकसरीचा कारभार केल्यानेच ७४.१८ कोटींचा ढोबळ नफा झाला. नाबार्ड व रिझर्व्ह बॅँकेच्या निकषानुसार आवश्यक त्या तरतुदी केल्या, यामध्ये प्रामुख्याने रजेचा पगार, ग्रॅज्युईटी अ‍ॅडव्हान्स, कर्मचारी बोनस, विकास संस्था सचिव बक्षीस, स्टॅण्डर्ड अ‍ॅसेट, एन. पी. ए., इन्कम टॅक्स यांसह विविध ४० कोटी ८७ लाख ४१ हजारांच्या तरतुदी केल्या. तरतुदी वजा जाता ३३ कोटी ३७ लाखांचा निव्वळ नफा झाला. यावेळी बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक रणवीर चव्हाण, आदी उपस्थित होते.सभासदांना १० टक्के लाभांश?निव्वळ नफ्यातून रिझर्व्ह फंडासह सभासदांना लाभांशाची तरतूद करायची आहे. साधारणत: गतवर्षीपेक्षा २ टक्के जादा म्हणजेच १० टक्के लाभांश देण्याचा मानस असून, त्याची रक्कम साधारणत: १८ कोटी रुपये होते.

‘दौलत’ची वसुली चालूच्या ताळेबंदात‘दौलत’ साखर कारखान्याची १६ कोटी ८० लाखांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर साधारणत: ११ कोटींचा हप्ताही येणार असल्याने चालूच्या ताळेबंदात तेवढ्याने नफा वाढणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

बॅँकेची तुलनात्मक प्रगती-

  1. तपशील मार्च २०१८ मार्च २०१९
  2. भागभांडवल १७६.२३ कोटी १९९.८५ कोटी
  3. आयपीडीआय बॉन्ड - ५० कोटी
  4. रिझर्व्ह व इतर फंड २७८.२७ कोटी ३१५.६२ कोटी
  5. ठेवी ४०५३.३७ कोटी ४७४०.१० कोटी
  6. गुंतवणूक १५९८.९६ कोटी १८०६.७१ कोटी
  7. कर्जे ३०११.०५ कोटी ३८५३.४६ कोटी
  8. ढोबळ नफा ५७.५६ कोटी ७४.१९ कोटी
  9. सीआरएआर १२.५५ टक्के ११.३८ टक्के
  10. निव्वळ एनपीए १.६० टक्के १.३८ टक्के

 

अशा केल्या तरतुदी-तरतुदी                            रक्कमरजेचा पगार                    ५ कोटी ७२ लाख ४७ हजारगॅ्रज्युईटी अ‍ॅडव्हान्स     ६ कोटी ८० लाख ६० हजारकर्मचारी बोनस               ६ कोटी ७५ लाख ८५ हजारसचिव पगार बक्षीस        १ कोटी २१ लाख ८ हजारस्टॅण्डर्ड अ‍ॅसेट                ३ कोटीएनपीए                          ५ कोटी ५० लाखइन्कमटॅक्स                   ११ कोटीकॅपीटल रिझर्व्ह              ५ लाख ४१ हजारसीबीएस फंड                  ८२ लाख---------------------------------------------एकूण तरतुदी              ४० कोटी ८७ लाख ४१ हजार--------------------------------------------------- 

 

टॅग्स :bankबँकkolhapurकोल्हापूर