शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वसुली १०० टक्के तरीही संस्थांकडे कोल्हापूर जिल्हा बँकेचे दुर्लक्ष, १ टक्का परतावा देण्याची मागणी

By राजाराम लोंढे | Updated: October 28, 2023 15:57 IST

जिल्ह्यातील ३५ टक्के विकास संस्था अनिष्ट दुराव्यात

राजाराम लोंढेकोल्हापूर : विकास संस्थांच्या पातळीवर १०० टक्के पीक कर्जांची वसुली करणाऱ्या संस्थांना जिल्हा बँक पूर्वी व्याजात सवलत देत होती. मात्र, सध्या अशा संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जात नसल्याने संस्था पातळीवर उदासीनता दिसत आहे. १,८७९ पैकी केवळ २४७ संस्थांनी १०० टक्के वसुली केली आहे.शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याने संस्था आर्थिक अरिष्टात आहेत. त्यामुळे १०० टक्के पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या संस्थांना बँकेने प्रोत्साहन म्हणून पूर्वीप्रमाणे १ टक्क्याप्रमाणे व्याज परतावा देण्याची मागणी होत आहे.पीक कर्जाची परतफेड करण्यात कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे. हे कर्जमाफीच्या आकड्यावरून सिध्द होते. राज्यात कर्जमाफीचा सर्वांत कमी लाभ कोल्हापूर जिल्ह्याला झाला, तर पीक कर्ज वाटपाच्या पातळीवर प्रोत्साहन अनुदानाचा सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच झाला. त्यात, राज्य व केंद्र सरकारने पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. यातूनही शेतकऱ्यांना परतफेडीसाठी प्रोत्साहन मिळते.जिल्हा बँकेच्या पातळीवर ८८ ते ९० टक्के वसुली होते. संस्था पातळीवरही ९० टक्क्याच्या पुढे वसुली होते. त्यातही संस्था पातळीवर १०० टक्के पीक कर्जाची वसुली करणाऱ्या व मध्यम मुदतीसह इतर कर्जाचे हप्ते नियमित असणाऱ्या विकास संस्थाही आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २४७ विकास संस्थांनी मेंबर पातळीवर १०० टक्के वसुली केली.अशा संस्थांना जिल्हा बँक पीक कर्ज वाटपावर १ टक्का व्याज सवलत देत होती. यामुळे संस्था पातळीवर वसुलीसाठी चढाओढ पाहावयास मिळत होती. मात्र, २००५ पासून जिल्हा बँकेने ही योजना बंद केल्याने शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांची संख्या कमी होत आहे. प्रोत्साहन म्हणून बँकेने ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील ३५ टक्के विकास संस्था अनिष्ट दुराव्यातशेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज पुरवठ्यामुळे विकास संस्थांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने ३५ टक्के विकास संस्था अनिष्ट दुराव्यात आहेत. याला केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील ११२ कोटी रक्कमही जबाबदार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक