शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडक्या बहिणीं’चा अर्ज, कोल्हापूर जिल्हा बँकेचे लगेच कर्ज; राज्यातील पहिली बँक, किती कोटी वाटप केले..जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: June 28, 2025 16:09 IST

जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाच्या लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी जिल्हा बँकेने कर्ज योजना सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत ५५०० महिलांना बँकेने १६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० टक्के व्याज दराने व मासिक हप्त्यावर कर्ज दिले जात असल्याने बँकेच्या बहुतांशी शाखांत कर्ज घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.राज्यात लाडक्या बहीण योजनेच्या कोट्यवधी महिला आहेत; मात्र त्यांच्यासाठी अगदी सुलभ हप्त्यासह कमी व्याज दराने कर्ज योजना सुरू करणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील एकमेव आहे. जिल्हा बँक म्हटले की पीक कर्ज देणारी अशी ओळख असते, मात्र कोल्हापूर जिल्हा बँकेने गेल्या पाच-सात वर्षांत समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी विविध कर्ज योजना सुरू केली आहे. काही कर्ज योजना बँकेने धाडसाने सुरू केल्या आहेत. त्यामुळेच बँकेचे कर्ज वाटप ७५०० कोटींच्या पुढे गेले आहे.लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या वतीने दरमहा दीड हजार रुपये मिळतात. या पैशावर बँकेने त्यांना छोट्या छोट्या व्यवसायासाठी ३० हजार रुपये अवघ्या १० टक्के व्याजाने कर्ज देण्यास १ एप्रिल पासून सुरुवात केली आहे. कर्ज परतफेडीची मुदत तीन वर्षे असून दरमहा ९६८ रुपये हप्ता आहे.

जिल्ह्यात दहा लाख लाभार्थीराज्य शासनाने १८ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी असून त्यातील जास्तीत जास्त महिलांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकेचे आहे.विनातारण कर्ज योजनाकर्ज देताना कोणत्याही प्रकारचे तारण घेतले जात नाही. लाडक्या बहीण योजनेतील दोन लाभार्थी महिलांना जामीनदार म्हणून घेतले जाते. फारशी कागदपत्रांची कटकट नसल्याने महिलांचा या कर्ज योजनेकडे ओढा आहे.

बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व संचालकांच्या संकल्पनेतून ही कर्ज योजना सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. - जी. एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)