शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

कोल्हापूर जिल्ह्यात नवे १८२ कोरोना रुग्ण, पाच मृत्यू, संख्या पोहचली २७०७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 18:08 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी पुन्हा उद्रेक झाला, दिवसभरात तब्बल पाच कोरोनाग्रस्तांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाचे जिल्ह्यात एकूण ६५ बळी ठरले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात नवे १८२ कोरोना रुग्ण, पाच मृत्यू, संख्या पोहचली २७०७ वर एकूण ६५ मृत्यू ; कोल्हापूर, इचलकरंजी शहरात कहर सुरुच

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी पुन्हा उद्रेक झाला, दिवसभरात तब्बल पाच कोरोनाग्रस्तांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाचे जिल्ह्यात एकूण ६५ बळी ठरले. सायंकाळपर्यत सुमारे नव्या १८२ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही २७०७ वर पोहचली आहे. कोरोनाग्रस्तांची दिवसेदिवस झपाट्याने वाढती संख्या ही प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे.जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येबरोबरच बळीची संख्याही आता झपाट्याने वाढू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर शहरात मुक्तसैनिक वसाहतमध्ये तर इचलकरंजी शहरात गणेशनगरमध्ये प्रत्येकी एका वृध्दाचा मृत्यू झाला तर करवीर तालुक्यात उचगाव व शिये, हातकणंगले तालुक्यात हुपरी येथेही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे कोल्हापूर शहरात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या ८, इचलकरंजीमध्ये २४, हातकणंगले तालुक्यात ६ तर करवीर तालुक्यात ५ वर पोहचली आहे. सद्या उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १०८५ असून १५९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर शहरात ५० हून अधिक नवे रुग्ण वाढले तर इचलकरंजी शहरासह करवीर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे उद्रेक सुरुच राहीला. पन्हाळा, हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे.

करवीर तालुक्यातील गांधीनगर, शिये, शिंगणापूर, तर पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तसेच हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रांगोळी आदी गावांत कोरोना रुग्णांचा समुह संसर्ग झाल्याने तेथे झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर