शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भक्तीमय व चैतन्यदायी वातावरणात ‘साई ’ पादुकांचे शिर्डीकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:21 IST

चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला.

ठळक मुद्देभक्तीमय व चैतन्यदायी वातावरणात ‘साई ’ पादुकांचे शिर्डीकडे प्रस्थहजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

कोल्हापूर : चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला.

कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथील साई दरबारमध्ये शिर्डीस्थित साई पादुकांचे दोन दिवस दर्शनसोहळा साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळाने आयोजित केला होता. बुधवारी दुपारी या पादुकांचे दर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही घेतले. (छाया : दीपक जाधव)साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त श्री साई संस्थान ट्रस्ट (शिर्डी) यांच्या सहयोगातून साई सेवा मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांच्यावतीने कोल्हापूरातील शिवाजी स्टेडीयम येथे उभारण्यात आलेल्या साई दरबारमध्ये साई बाबांच्या पादुका दोन दिवस दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

गेल्या दोन दिवसांत हजारो महिला व पुरुष भक्तांनी शिस्तबद्धरित्या रांगा लावून या पादुकांचे दर्शन घेतले. सकाळी सात वाजता पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. १२ वाजून १० मिनिटांनी मधान्ह आरती करण्यात आली. दर्शन सोहळ्यानिमित्त प्रल्हाद व विक्रम प्रस्तुत ‘भक्ती तरंग’ हा साई गीतांचा बहरदार कार्यक्रमाच्या सादरीकरणाने चैतन्यदायी व भक्तीमय वातावरणाची झालर निर्माण केली.

या सोहळ्यास दिलेल्या सहयोगाबद्दल संस्थानतर्फे कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान खासदार धनंजय महाडीक व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही पादुकांचे दर्शन घेतले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या पादुका पुन्हा फुलांचा वर्षावात पुन्हा शिर्डीकडे बसमधून मार्गस्थ झाल्या.

यावेळी माजी महापौर रामभाऊ फाळके, माजी नगरसेवक विनायक फाळके, उद्योजक गिरीश शहा,विनायक माने, नगरसेवक सचिन पाटील, प्रशांत माने, दिलीप देसाई, पद्माकर कापसे, मोहन घाटगे, सुभाष जाधव, गुलाब सरनोबत, दिपक मुधाळे, अजित पाटील, उदय महाजन, किरण भट, अनिल पाटील, तानाजी कारंडे, रितेश रामदासी, संदेश खोत, अभिजीत सरोदे आदी उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर