शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर देवस्थान समिती होऊ शकते बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:37 IST

युती सरकारच्या काळात या समित्यांवर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता नवे सरकार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागणार आहेत.

ठळक मुद्देराज्यातील चार देवस्थाने सरकारच्या अखत्यारित

कोल्हापूर : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील श्री सिद्धिविनायक, शिर्डी, कोल्हापूर आणि पंढरपूर या प्रमुख देवस्थान समित्या बरखास्त होऊन तेथे नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होऊ शकते. सिद्धिविनायकचे अध्यक्षपद शिवसेनेला, शिर्डीचे काँग्रेसला, तर पंढरपूर व कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात श्री सिद्धिविनायक, शिर्डी साईबाबा, पंढरपूर व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील देवस्थान मिळून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती ही चार प्रमुख देवस्थाने राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. या देवस्थानांवर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची निवड त्या-त्या वेळच्या सरकारकडून केली जाते.

युती सरकारच्या काळात या समित्यांवर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता नवे सरकार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सरकार महामंडळे व समित्यांवर त्यांची नियुक्ती करू शकतात.

राजकीय संकेतानुसार सरकार बदलले की विद्यमान समिती व महामंडळांवरील पदाधिका-यांनी स्वत:हून राजीनामे देणे अपेक्षित असते. त्यांना हटवून नव्या सरकारची नियुक्ती करण्यासाठी आधी दिलेल्या नियुक्ती आदेशातील तरतुदी, कायदेशीर बाबी तपासाव्या लागतात. सरकारमध्ये एकमताने ठराव होऊन तो राज्यपालांकडे सहीसाठी जातो. त्यांची मान्यता मिळाली की नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. सध्या समितीवर भाजपसोबतच शिवसेनेचेही पदाधिकारी आहेत, समिती बरखास्त झाली तर शिवसेनेच्याच त्याच कार्यकर्त्यांना नव्याने संधी मिळू शकते.न्यायालयाचा निर्णय सरकारच्या बाजूनेजनता दलाचे सरकार पडले त्या १९८० च्या दरम्यान ईश्वरचंद दलवाई हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर काँग्रेसचे सरकार आल्याने कार्यकाल संपण्यापूर्वीच दलवाई यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने समितीचे पद किंवा अधिकार हे सरकारने दिलेले असतात, ते संपादन केले नसतात, त्यामुळे तुम्ही त्यावर हक्क सांगू शकत नाही, असे म्हणत सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयानंतर पुढे तीन वर्षे तत्कालीन जिल्हाधिकारी समितीचे प्रशासक म्हणून काम करत होते. १९८३ साली अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.कार्यकाल पूर्ण...काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सात वर्षे देवस्थान समितीला अध्यक्षच नव्हते. पाच वर्षांपूर्वी युतीचे सरकार आल्यानंतर समित्या व महामंडळांवर नियुक्त्या करण्यात आल्या, त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समितीवर होते. या पदाधिकाºयांना हटविण्याऐवजी त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीत काय घडेल, हे येत्या काळातच ठरेल. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर