शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : देशव्यापी ‘चक्का जाम’ यशस्वी करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:48 IST

परिवहन क्षेत्राला मारक असलेली सरकारची चुकीची धोरणे व दादागिरी यांच्याविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या आदेशानुसार देशभरातील माल व प्रवासी वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २०) आयोजित केलेले देशव्यापी चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या मेळाव्यात सर्वांनुमते करण्यात आला.

ठळक मुद्देदेशव्यापी ‘चक्का जाम’ यशस्वी करण्याचा निर्धारकोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या मेळाव्यात निर्णय

कोल्हापूर : परिवहन क्षेत्राला मारक असलेली सरकारची चुकीची धोरणे व दादागिरी यांच्याविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या आदेशानुसार देशभरातील माल व प्रवासी वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २०) आयोजित केलेले देशव्यापी चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या मेळाव्यात सर्वांनुमते करण्यात आला.शुक्रवारपासून होणाऱ्या आंदोलनात नियमित होणारी डिझेल दरवाढ रद्द करावी. टोल प्रक्रिया पारदर्शी करावी. थर्ड पार्टी विमा हप्त्यामधील वार्षिक दरवाढ रद्द करावी; जीएसटी व ई-वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणारा विलंब यांत सुधारणा करावी.

पर्यटन वाहनासाठी दीर्घ मुदतीसाठी आॅल इंडिया परमिट मिळावे. आरटीओ व पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. आयकर कलम ४४ ए नुसार बेकायदेशीररीत्या आकारणी होणारा आयकर रद्द करा. आॅल इंडिया परमिट असलेल्या वाहनांवर दोन चालकांची सक्त रद्द करावी, यांसह अन्य प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.

यानिमित्त शाहूपुरीतील वसंतराव चौगुले सभागृहात कोल्हापुरातील ट्रक, टेम्पो, टँकर, बसवाहतूक करणाऱ्या मालकांसाठी जनजागृती मेळावा आयोजित केला होता. त्यात महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकारी व सभासदांनी शनिवारपासून पुकारलेले चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डेसले, बाबलशेट फर्नांडिस, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमय्या, बबन महाजन, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर