शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  गाळप परवाने थांबवण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:58 IST

एफआरपी अधिक २00 रुपये सूत्राप्रमाणे गेल्या हंगामातील उसाची बिले काही कारखान्यांनी थकवली असतानाही प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे पूर्ण एफआरपी दिल्याची माहिती कळवली आहे, अशाप्रकारे खोटी माहिती देऊन शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, त्यांचे गाळप परवाने थांबवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.

ठळक मुद्देगाळप परवाने थांबवण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनखोटी माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करा

कोल्हापूर : एफआरपी अधिक २00 रुपये सूत्राप्रमाणे गेल्या हंगामातील उसाची बिले काही कारखान्यांनी थकवली असतानाही प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे पूर्ण एफआरपी दिल्याची माहिती कळवली आहे, अशाप्रकारे खोटी माहिती देऊन शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, त्यांचे गाळप परवाने थांबवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली.संघटनेतर्फे बुधवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात अचानक आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांनी प्रभारी साखर उपसंचालक डी. एस. खांडेकर यांना निवेदन दिले. साखर सहसंचालक सचिन रावळ हे परगावी असल्याने पुढील दोन दिवसांत त्यांची भेट घेऊन कारखान्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.संघटनेतर्फे भगवान काटे, अजित पोवार यांनी प्रभारी संचालक खांडेकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत एफआरपी थकवणाऱ्या  कारखान्यांची माहिती मागितली. खांडेकर माहिती देत असताना महाडिक शुगर्स, इको केन आणि गायकवाड कारखान्यांनी एफआरपी अधिक २00 नुसार दर दिले नसल्याचा मुद्दा काटे व पोवार यांनी मांडला.

यावर खांडेकर यांनी महाडिक शुगर्सच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून वस्तूस्थिती जाणून घेतली असता एफआरपी दिली आहे; पण २00 चा हप्ता काही शेतकऱ्यांना देणे थकीत असल्याची कबुली दिली. यावर संतप्त झालेल्या पोवार व काटे यांनी खोटी माहिती का दिली, तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करू, अशा शब्दांत दम भरला.काटे यांनी तर खांडेकर यांना धारेवर धरत साखर सहसंचालक सचिन रावळ आल्यानंतर तातडीने या तीन-चार कारखान्यांवर कारवाईचा प्रस्ताव तयार करून साखर आयुक्तांकडे पाठवा, असा दम भरला. यावर खांडेकर यांनी तातडीने साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवू, असे सांगितले.२00 रुपये देतानाच नाकी दम आल्याचे महाडिक शुगर्सच्या अधिकाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न केला. यावर संतापलेल्या अजित पोवार यांनी तुमच्या साखरेचे दर उतरले म्हणून तुमचा तोटा वाढला, असे म्हणता, मग खतांच्या किमती भरमसाट वाढल्या, भांगलणीची मजुरी वाढली, विजेच्या किमती वाढल्या, त्याची भरपाई कोण देणार ?, ऊस घेताना दर जास्त देतो म्हणून घोषणा करून, ऊस उचलणार आणि प्रत्यक्षात मात्र कमी दर देणार, हा तुमचा उफराटा न्याय आम्ही का सहन करायचा?, गोड बोलून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये, असे सुनावले.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर