शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  चिनी फटाक्यांवर बंदी घालावी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:30 IST

चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत; त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

ठळक मुद्दे चिनी फटाक्यांवर बंदी घालावीहिंदुत्ववादी संघटनांची मागणी

कोल्हापूर : चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत; त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करताना ‘पोटॅशिअम क्लोराईड’ आणि ‘पोटॅशिअम परक्लोराईड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते.

 भारतात रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी आहे; त्यामुळे केंद्र सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली आहे, तरीही अवैध मार्गाने हे फटाके देशात येऊन त्याची विक्री होत आहे, तरी त्यावर कारवाई करून त्याच्या विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी. तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्याचबरोबर फटाक्यांवरील चित्रांद्वारे हिंदू देवदेवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबनाही थांबवावी.शिष्टमंडळात मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, किशोर घाटगे, राजू यादव, सुरेश चव्हाण, शरद माळी, मनोहर सोरप, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीkolhapurकोल्हापूर