शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भाजप सरकारविरोधात वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 11:36 IST

केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सेल्स अ‍ॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देभाजप सरकारविरोधात वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची निदर्शनेकामगारविरोधी धोरणाला विरोध

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सेल्स अ‍ॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले.सकाळी अकराच्या सुमारास सर्व वैद्यकीय प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. त्यानंतर सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, सचिव विजय धनवडे, प्रशांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार गुरू बिराजदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकार हे गेल्या चार वर्षांपासून कामगारांच्या कायद्यांमध्ये बदल करून कामगारांचे हक्कच काढून घेत आहे तसेच कॉर्पाेरेट कंपन्यांच्या हिताचे निर्णय घेऊन नवीन कायदा अंमलात आणण्याचा घाट या सरकारकडून सुरू आहे.

जे कामगार सध्या कायमस्वरूपी आहेत त्यांना नवीन कायद्यांमुळे बोनस, ईएसआयसी, पीएफ, यासारखे लाभ मिळणार नाहीत तसेच ट्रेड युनियन बनविणे व ती कामगारांच्या कल्याणासाठी चालविणे हा लढण्याचा हक्कच काढून घेतला जात आहे. यामुळे कंत्राटीकरणास बळ मिळणार असून कॉर्पाेरेटवाल्यांना मनमानी करायला एकप्रकारे मदतच होणार आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत.आंदोलनात विवेक गोडसे, सचिन पाटील, अविनाश सोहनी, प्रसाद देसाई, प्रीतम कासार, संग्राम बोंबाडे, दिनेश पाटील, विकास पाटील, नामदेव उरूणकर आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmedicinesऔषधं