शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची हद्दवाढ महापालिका निवडणुकीनंतरच, जयश्री जाधव यांच्या लक्षवेधीला विधानसभेत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:56 IST

कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी मिळवण्यास अडचणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्यांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री (अतिरिक्त) उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले. काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.मंत्री सामंत म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर सहा महिने शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय घेतले जाऊ नयेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असल्याने सरकारला निर्णय घेण्यात अडचणी आहेत. मुख्यमंत्री हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत, म्हणून महापालिका निवडणूक झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला; परंतु कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटला आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास शासनाने त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.महापालिकेने २०१३ पासून २०२१ पर्यंत चार वेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. २०१४ मध्ये १७ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हद्दवाढीला मान्यता दिलेली नाही. कोल्हापूरवासीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात असल्याचे जाधव यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना, त्यांनी महानगरपालिकेकडून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागविला होता. त्यानुसार प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ गावे व दोन एमआयडीसींसह नवीन प्रस्ताव सादर केला आहे; पण त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर