शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून; खासदार धनंजय महाडिक यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:19 IST

नागपूर, गोवा विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

कोल्हापूर : कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली.इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केल्यामुळे कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. २७ ऑक्टोबरपासून ही थेट विमानसेवा सुरू होईल. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रदीर्घ काळापासून कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-गोवा या मार्गावरील विमानसेवा सुरू करण्याची मागणी उद्योजक, कारखानदार यांच्याकडून होत होती. कोल्हापूरकरांची ही मागणी पूर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाईसेवा सुरू होण्याचा प्रस्ताव, सध्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या महासंचालकांकडे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर-दिल्ली थेट विमानसेवा सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.अशी असेल विमानाची फेरीसकाळी १० वाजून १० मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाण करेल आणि दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल. त्यानंतर १ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण होईल आणि सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी विमान दिल्लीला पोहोचेल.

गेली काही वर्षे कोल्हापूरहून दिल्लीला थेट विमानसेवा असावी, अशी मागणी होत होती. कोल्हापूरच्या आसपास निपाणीपासून कोकणापर्यंत अनेकांनी याबाबत सूचना केली होती. यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून आता लवकरच ही सेवा सुरू होत आहे. कोल्हापूरहून थेट देशाच्या राजधानीला विमानसेवा झाल्याने कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी ही निश्चित पूरक अशी बाब आहे. - धनंजय महाडिक, खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळdelhiदिल्लीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक