शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुदद्वारात हवा सोडल्याने कामगाराचा मृत्यू, हेर्ले येथील फौंन्डीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:08 IST

कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे येथील फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दूर्देवी मृत्यू झाला. आदित्य दत्तात्रय जाधव (वय २९, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देगुदद्वारात हवा सोडल्याने कामगाराचा मृत्यूहेर्ले येथील फौंन्डीतील घटना

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे येथील फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री दूर्देवी मृत्यू झाला. आदित्य दत्तात्रय जाधव (वय २९, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

एकुलत्या मुलाच्या मृत्यूने जाधव कुटूंबिय उघड्यावर पडले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहुपूरी पोलीसांनी कारखान्यातील संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये हवा सोडलेनंतर काही सेंकदात आदित्य जमिनीवर कोसळल्याचे स्पष्ट दिसत आहे.अधिक माहिती अशी, आदित्य जाधव याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई-वडील शेती करतात. घरी तो आणी बहिण असे चौघेजण राहत होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो अतिग्रे येथील एका फौंन्ड्रीमध्ये कामाला जात होता. नेहमीप्रमाणे ३ सप्टेंबर रोजी रात्रड्युटीवर तो गेला.

मध्यरात्री तो बेशुध्द पडल्याने येथील कामगारांनी त्याला इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती गंभीर असलेचे पाहून येथील डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलविण्यास सांगितले. त्यानुसार नागाळा पार्क येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. आदित्यला यापूर्वी कसलाच त्रास नव्हता. अचानक तो बेशुध्द कसा पडला.

यासंबधी नातेवाईकांनी कारखान्यामध्ये नेमका काय प्रकार घडला याची माहिती घेतली. येथील व्यवस्थापकाने कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य संबधीत सुपरवायझर जवळ आला. यावेळी त्याने आदित्यच्या केसावर, कपड्यावर हवा मारत असताना चेष्टेने प्रेशरने गुदद्वारात हवा सोडली.

अचानक जोराचा धक्का बसून तो खाली कोसळला. यावेळी सुरपवायझरने कोणताही गाजावाजा न करता त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतू आदित्य निपचीत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उजेडात आला. घटनेपासून संशयित सुपरवायझर गायब आहे.

पाहा व्हिडीओ - 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर