शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘मेन राजाराम’मध्ये कोल्हापूर दर्शन संग्रहालय व्हावे, इमारतीच्या संवर्धनाची गरज

By समीर देशपांडे | Updated: December 9, 2024 13:10 IST

शाळा न हलवताही शक्य

समीर देशपांडेकोल्हापूर : शहराच्या मध्यभागी, अंबाबाई मंदिराच्या परिसरात २२ मोठ्या खोल्यांची असलेली ही इमारत गेली अनेक वर्षे आहे त्या स्थितीत आहे. पाचवी ते दहावी फक्त ७५ विद्यार्थी. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयात ७२९ विद्यार्थी. या सर्वांसाठी ११ खोल्या रोज वापरल्या जातात. उर्वरित खोल्या रिकाम्याच. पाठीमागील बाजूस असणाऱ्या अनेक खोल्यांमध्ये भंगार साहित्य. या ठिकाणी नियोजन करून ‘कोल्हापूर दर्शन’ संग्रहालय केले, तर त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. फक्त हे काम जिल्हा परिषदेने आणि कोल्हापूरच्या नेत्यांनी मनावर घ्यायला हवे.कोल्हापूर संस्थानात छत्रपती बाबासाहेब महाराज यांनी मूळ नागोजीराव पाटणकर यांना १८ ऑगस्ट १९६६ ला दत्तक घेतले. त्यांचे नामकरण राजाराम महाराज दुसरे झाले. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत बाबासाहेब महाराजांचे निधन झाले आणि राजाराम महाराजांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांनीच जुन्या राजवाड्याच्या परिसरात नगारखान्यालगत हायस्कूलची उभारणी केली. हेच ते ‘मेन राजाराम’ हायस्कूल. दुमजली राजवाड्यासारखीच इमारत, त्यातील मोठ्या खोल्या, देखणे सभागृह, वक्राकार जिने, घुमटाकार आकाराचे सज्जे अशा वैशिष्ट्यांची ही इमारत.

गेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे या इमारतीचे व्यवस्थापन आहे; परंतु रस्ते आणि गटारीच्या पलीकडे ही संस्था फार कमी वेळा विचार करते. नेतेही त्या पलीकडे जात नसल्याने मग अधिकारी अंगावर काही ओढवून घेत नाहीत; परंतु कोल्हापूरच्या मध्यभागी असलेल्या या सोन्यासारख्या जागेचा एकीकडे उत्पन्नवाढीसाठीही उपयोग करून घेताना ही इमारतही जपली जावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. त्यामुळेच आता या इमारतीच्या पूर्ण वापराबाबत चर्चा व्हायला हवी. निर्णय व्हायला हवा.

शाळा न हलवताही शक्यया ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय सकाळी भरते. ७२९ मुले-मुली शिकत आहेत. त्यांच्यासह माध्यमिक शाळेतील ७५ मुलांची गैरसोय न करता त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा पुरवून अजूनही अनेक खोल्या रिकाम्या आहेत. पाठीमागील बाजूस तर अनेक खोल्यांमध्ये भंगार साहित्य भरून ठेवण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे या साहित्याला हातही लागलेला नाही. त्यामुळे या परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारतींमध्ये नको असलेले साहित्य काढून शाळा सुरूच ठेवून या ठिकाणी संग्रहालय उभारणे शक्य आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.

‘पुरेपूर कोल्हापूर’ इथे समजेलकोल्हापुरात न्यू पॅलेस संग्रहालयात शाहू महाराजांविषयी सर्व काही आहे. मांडरे कलादालनात चित्रे आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर संग्रहालयात खांडेकरांविषयी सबकुछ आहे; परंतु ‘पुरेपूर कोल्हापूर’ची एकत्रित माहिती मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या ठिकाणी उर्वरित जागेत कोल्हापूरचा इतिहास, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सामाजिक चळवळींपासून ते कुस्तीपर्यंत आणि मर्दानी खेळापासून ते शाहिरीपर्यंत, चित्रपटांपासून ते उद्योगापर्यंतची एकत्रित माहिती या ठिकाणी उत्तम आणि आकर्षकपणे मांडल्यास अंबाबाईला येणारा पर्यटक निश्चित या ठिकाणी भेट देईल यात शंका नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर