शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोल्हापूर :धोकादायक जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली, लक्ष्मीपुरीतील घटना : जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:48 IST

लक्ष्मीपुरीतील वालावलकर कापड दुकानाला लागून असलेल्या पारगावकर यांच्या जुन्या इमारतीची पाठीमागील खचलेली गॅलरी रविवारी दुपारी कोसळली. इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या रहिवाशांना आपत्कालीन विभागाचे पथक, अग्निशमन दल व पोलिसांनी सुखरूप खाली उतरले. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच इमारत मालक अनिल पाटगावकर यांना नोटीस पाठवून दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देधोकादायक जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली लक्ष्मीपुरीतील घटना : जीवितहानी नाही

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील वालावलकर कापड दुकानाला लागून असलेल्या पारगावकर यांच्या जुन्या इमारतीची पाठीमागील खचलेली गॅलरी रविवारी दुपारी कोसळली. इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या रहिवाशांना आपत्कालीन विभागाचे पथक, अग्निशमन दल व पोलिसांनी सुखरूप खाली उतरले. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच इमारत मालक अनिल पाटगावकर यांना नोटीस पाठवून दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.अधिक माहिती अशी, अनिल पाटगावकर यांची लक्ष्मीपुरीत वालावलकर दुकानाला लागून चार मजली पारगावकर कॉम्प्लेक्स आहे. १९३५ साली या इमारतीचे बांधकाम झाले आहे. त्यामध्ये उदयनराजे रामनाथ पारगावकर, सुप्रिया राजशेखर पारगावकर, अविनाश शांताराम पारगावकर अशी तीन कुटुंबे राहतात.

इमारतीमध्ये अडकलेल्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढताना अग्निशामक दलाचे जवान.

एका कुटुंबाला चौथ्या मजल्यावर दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या; परंतु न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याने त्या खोल्या सोडलेल्या नाहीत; शिवाय तो या ठिकाणी राहण्यासही नाही. त्यामुळे या खोलीच्या पाठीमागे असलेली गॅलरी खचली होती. रविवारी दुपारी ही गॅलरी कोसळून खाली प्रवेशद्वारासमोर पडून मोठा आवाज झाला. त्यामुळे इमारतीमधील लोक भीतीने आरडाओरडा करू लागले. शेजारील लोकांनी तत्काळ अग्निशमन दलास फोन करून बोलावून घेतले.जवान तानाजी कवाळे, ओंकार खेडकर, केरबा निकम, रजाक मुल्लाणी, सर्जेराव कांबळे, विशाल चौगुले, आदींचे पथक दोन बंब घेऊन दाखल झाले. रुग्णवाहिका व जिल्हा आपत्कालीन विभागाचे अधिकारी प्रसाद संकपाळ पाठोपाठ आले. जवानांनी इमारतीमध्ये अडकून राहिलेल्या कुटुंबीयांना सुखरूपपणे खाली आणले. त्यानंतर संपूर्ण इमारतीची पाहणी केली. मोडकळीस आलेला भाग तत्काळ काढण्यात आला.प्रशासनाची तारांबळसध्या शहरात नवरात्रौत्सवाचे वातावरण आहे. कोल्हापुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. अशा वेळी अचानक घडलेल्या या घटनेने प्रशासनाची तारांबळ उडली. लक्ष्मी रोडवर बघ्यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी काही काळ या मार्गावरील वाहतूक वळविली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी थांबून होते.

भीतीने वृद्धा बेशुद्धगॅलरी कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. यावेळी भीतीने वृद्धा योगिता पाटगावकर (वय ७०) या बेशुद्ध झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना उचलून सुखरूपपणे खाली आणले. काही वेळाने त्या शुद्धीवर आल्या. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर