शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दाभाडेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:49 IST

सदर बझार येथील अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. ओंकार उर्फ भुकंप उर्फ बंड्या अनिल दाभाडे (वय १९,  मूळ.रा. सातवे-सावर्डे ,ता. पन्हाळा) असे अटक केलेल्या नराधमाचे नांव आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दाभाडेस अटकशाहूपुरी पोलिसांनी केली कारवाई, गुन्हा दाखल

कोल्हापूर : सदर बझार येथील अल्पयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. ओंकार उर्फ भुकंप उर्फ बंड्या अनिल दाभाडे (वय १९,  मूळ.रा. सातवे-सावर्डे ,ता. पन्हाळा) असे अटक केलेल्याचे नांव आहे. दरम्यान, रविवारी (दि.१६) सदरबझार परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी त्याला रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. चौकशीत संशयिताने गुन्हा कबुल केला.पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. त्यावेळी संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याची माहिती पीडितेने आजीला दिली. आजीने संशयित दाभाडे याच्याविरोधात फिर्याद दिली. पण ; संशयिताला पोलिसांनी अटक केली नव्हती. त्यामुळे रविवारी सायंकाळी संशयिताला अटक करावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिस अधिकाऱ्यांनी संशयितास अटक करतो, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.संशयित सातवे-सावर्डे येथे त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. ओंकार दाभाडे हा गेल्या तीन महिन्यापासून त्याच्या आजीकडे सदरबझार येथे राहावयास होता. तो कोणताही काम धंदा करत नाही तर वडिल रिक्षाचालक आहेत. सोमवारी दूपारी संशयित दाभाडेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले.याप्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमृता मेणकर करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर