शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कोल्हापूर : 'रंगबहार'तर्फे दि. वी. वडणगेकर यांना पाचवा जीवनगौरव, २१ जानेवारी रोजी रंगणार 'मैफल रंगसुरांची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:37 IST

 रंगबहार या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत रविवार, दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत 'मैफल रंगसुरांची' हा सोहळा टाउन हॉल येथील उद्यानात पार पडणार आहे. याच वेळी पाचवा रंगबहार जीवन गौरव पुरस्कार दि. वी. वडणगेकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देचंद्रकांतदादांच्या हस्ते पुरस्कार वितरण२१ जानेवारी रोजी रंगणार 'मैफल रंगसुरांची'दि. वी. वडणगेकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कारदेशभरातील कलावंत मैफिलीत होणार सहभागी

कोल्हापूर : चाळीसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रंगबहार या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत रविवार, दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत 'मैफल रंगसुरांची' हा सोहळा टाउन हॉल येथील उद्यानात पार पडणार आहे. याच वेळी पाचवा रंगबहार जीवन गौरव पुरस्कार दि. वी. वडणगेकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत जाधव यांनी दिली.गेल्या ४० वर्षांतील चित्रचळवळीच्या इतिहासात 'रंगबहार' या संस्थेने कोल्हापूरच्या दृश्य कलेच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संस्थेमार्फत कलारसिकांच्या साक्षीने कोल्हापुरात दरवर्षी जानेवारी महिन्यात 'मैफल रंगसुरांची' या नावीन्यपूर्ण उपक्रमातून देशातील प्रख्यात चित्रकार, शिल्पकार, रंगावलीकार, हस्तकला विशारद आणि गायक यांची प्रात्यक्षिके सादर करतात.

प्रत्येक वर्षी १६ जानेवारीनंतरच्या पहिल्या रविवारी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिदिनी टाऊन हॉलच्या हिरवळीवर 'मैफल रंगसुरांची' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीची पाचवी मैफल रविवारी २१ जानेवारी रोजी होत आहे.रंगबहारची कार्यकारिणीहा उपक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी या मैफिलीस उपस्थित रहावे असे आवाहन 'रंगबहार'च्या कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.'रंगबहार'च्या नव्या कार्यकारिणीत दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी हे अध्यक्ष आहेत.

उपाध्यक्ष अमृत पाटील, सचिव धनंजय जाधव, सहसचिव अशोक पालकर, तसेच विजय टिपुगडे, सागर बगाडे, संजीव संकपाळ, अतुल डाके, सर्जेराव निगवेकर, किशोर पुरेकर, राहुल रेपे हे सदस्य आहेत. समन्वयक म्हणून रियाज शेख आणि उज्ज्वल दिवाण हे सक्रिय आहेत तर व्ही. बी. पाटील हे मार्गदर्शक आहेत.

दि. वी. वडणगेकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कारज्येष्ठ चित्रकार दि. वी. वडणगेकर यांना यवर्षी रंगबहार जीवनगौरव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार व्ही. ए. माळी (मरणोत्तर पुरस्कार), ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. टोपकर, ज्येष्ठ हस्तकलाकार विजयमाला मेस्त्री (बाबूराव पेंटर घराणे) आणि हास्यचित्रकार शि.द. फडणीस यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.हे कलावंत मैफिलीत होणार सहभागीया वर्षीच्या मैफल रंगसूरांची या मैफिलीमध्ये देशभरातील कलावंत सहभागी होत आहेत. यामध्ये शास्त्रीय गायिका गौरी पाध्ये, तबला वादक प्रशांत देसाई, चित्रकार नेहा बन्सल, अरिफ तांबोळी, अदिती कांबळे, प्रितेश चिवटे, सत्यजित पाटील, स्वरूप कुडाळकर, आकाश गाडे, समाधान रेंदाळकर, भाऊसाहेब पाटील, स्वप्नील पाटील यांचा समावेश आहे. शिल्पकार म्हणून अजित चौधरी, अभिलाष भालेराव, सागर सुतार, किरण कुंभार, विजय कुंभार, अभिजित कुंभार यांचा, मांडणशिल्प कलाकार दीपक भुईंगडे, रांगोळीकार अमृत रासम आणि सूर्यकांत पाटील, तर मंदार वैद्य ओरिगामी कला सादर करणार आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक